बहुजननामा ऑनलाईन – केस स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शाम्पू करणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु बहुतेक शाम्पूमध्ये केमिकल असल्यामुळे केसांचे नुकसान होण्याचा धोका असतो. परंतु आपण शाम्पूऐवजी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून केस स्वच्छ करू शकता.
१) अंड्यातील पांढरा भाग-
केस धुण्यासाठी आपण अंड्याचा पांढरा भाग देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात २ अंड्यातील पांढरा भाग काढून घ्या.नंतर हे टाळू आणि केसांवर १० मिनिटे लावा. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा. यामुळे केस स्वच्छ होतील तसेच केसांचे पोषण होईल.
२)कोरफड जेल –
कोरफड जेल पोषक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. केसांना कोरफड जेल लावल्याने केस मुळांपासून मजबूत होतात.यासोबत डोक्यातील कोंडा, केसांची समस्या कमी होण्यास मदत होते तसेच केस लांब, दाट, मऊ आणि चमकदार होतील. यासाठी ४-५ चमचे कोरफड जेल घ्या व संपूर्ण केसांवर लावून १० मिनिटे मालिश करा. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.
३)कडुलिंबाची पाने-
शैम्पूच्या जागी आपण कडुलिंबाची पाने वापरू शकता. हे केसांची स्वच्छता तसेच डोक्यातील कोंडयापासून मुक्त होण्यास मदत करेल. यासाठी कडुलिंबाची पाने धुऊन बारीक करून मिश्रण तयार करा. तयार मिश्रण टाळू आणि संपूर्ण केसांवर लावा. १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने केस धुवा.
४)मुलतानी माती-
मुलतानी माती केस साफ करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. हे शैम्पूच्या जागी वापरू शकता. यासाठी एका भांड्यात २ चमचे मुलतानी माती, १ चमचा मध आणि २ चमचे दही याचे मिश्रण तयार करावे. तयार झालेल्या मिश्रणाने केसांची मालिश करा. नंतर पाण्याने केस धुवा. हे केसांना आर्द्रता प्रदान करेल तसेच डोक्यातील कोंडयाची समस्या दूर होईल. केस सुंदर, जाड, कोमल दिसतील.