वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – वॉशिंग्टन(डीसी) येथे रात्री दहाच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हॉइट हाऊसपासून जवळ असलेल्या वॉशिंग्टनमधील रस्त्यावर ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेनतंर स्थानिक पोलीस तात्काळ घटनेस्थळी दाखल झाले. सदर परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
#UPDATE One dead, five injured in Washington, D.C. shooting, says Police: Reuters https://t.co/Ry7A55UNGI
— ANI (@ANI) September 20, 2019
वॉशिंग्टनच्या उत्तर-पश्चिमेकडील कोलंबिया रोडवर ही घटना काल (गरुवारी दि 19 सप्टेंबर) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सदर परिसर सील करण्यात आला आहे.
'Multiple' people shot on streets of Washington, D.C., reports Reuters quoting local media pic.twitter.com/V4FPYQn4JN
— ANI (@ANI) September 20, 2019
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. गोळीबाराची ही तशी पहिलीच घटना नाही. अमेरिकेत यापूर्वीही गोळीबार झल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत गन कल्चरविरोधात केवळ अनेक निषेध नोंदवले गेले आहेत, परंतु त्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.