नवी दिल्ली, वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते असल्याचे सांगितले. ट्रम्प म्हणाले की पंतप्रधान मोदी महान आहे ते खूप चांगले आहेत. कोरोना व्हायरसने बेहाल झालेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की भारताकडून 29 मिलियन औषधांचे डोस खरेदी करण्यास सांगितले होते. यापेक्षा जास्त औषधांचे डोस भारताकडून पाठवण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणाले की भारताने औषधांच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. भारताने आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी औषधांच्या निर्यातीवर बंदी आणली होती. ते म्हणाले पंतप्रधान मोदी महान आहे आणि खूप चांगले आहे. भारताकडून अद्याप अनेक वस्तू येणं बाकी आहे. ते म्हणाले अमेरिकेने कोरोनाच्या लढ्यासाठी भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची 29 मिलियन औषधांच्या डोसची खरेदी केली आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी संकेत दिले की जर भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील प्रतिबंध हाटवले नाहीत तर अमेरिका कारवाईचा विचार करु शकते. या औषधांचा वापर कोरोनाच्या संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी केला जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींकडे औषध पुरवण्यासाठी विनंती केली होती.