नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले असून काल गुजरातच्या मोटेरा स्टेडियमवर कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. तसेच त्यांनी त्यांचे कठोर म्हणूनही वर्णन केले. आतंकवादात सहभागी असण्याबद्दल, पाकिस्तानवर आतंकवादासाठी दबाव आणण्याची इच्छा व्यक्त केली. सोबतच त्यांनी त्यांचा देश भारताला उच्चस्तरीय संरक्षण संसाधने देईल. ट्राम यांच्या या वाक्याने अमेरिकेकडे भारतात असलेल्या संरक्षण शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनाची आशा निर्माण करत आहे.
ट्रम्प यांच्या या दौऱ्यावर जगातल्या इतर देशांचीही नजर आहे. ट्रम्प यांच्या भारतभेटीमुळे चीनला चिंता होत आहे. तसेच ट्रम्प यांच्या जाळ्यात न येण्याचा सल्लाही चीनने भारताला दिला आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचेही लक्ष ट्रम्प यांच्या भारतभेटीवर असून रशिया आतापर्यंत भारताचा सर्वात विश्वासनीय आणि मोठा सामरिक भागीदार देश आहे. ट्रम्प यांच्या भेटीमुळे रशियाची चिंता वाढली आहे. यासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, तुर्की आणि युरोपीय देशांचे लक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर होते.
ट्रम्प यांच्या मोटेरा स्टेडियमवरील भाषणावरून भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक आणि विश्वासार्ह सामरिक भागीदारी वाढली असल्याचे दर्शवतात. हैदराबाद हाऊस येथील द्विपक्षीय बैठकीदरम्यान दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात नवीन पाऊल उचलू शकतात.
काही संरक्षण शस्त्रे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण किंवा सामायिक उत्पादन सहमती दर्शविली जाऊ शकते. भारतासाठी नौदलाबरोबर 24 MH-60 अटॅकिंग हेलिकॉप्टरची सहमती मान्य केली जात आहे. तसेच ट्रम्प यांनीही या कराराचे संकेत दिले असून दोन्ही देशांत व्यवसाय क्षेत्रातही तेजीची चिन्हे दिसत आहेत. व्यापार करारावरही सर्व सकारात्मक असेल अशी अपेक्षा आहे.