नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिकारांचा गैरवापर आणि संसदेच्या कामात अडथळे असलेल्या आरोपांवरून पदच्युत कारण्यासाठी महाभियोगाची कारवाई २१ जानेवारीपासून सिनेटमध्ये सुरु झाली असून ट्रम्प हे महाभियोगास सामोरे जावे लागणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहते. महाभियोग खटल्यातून डोनाल्ड ट्रम्प यांची निर्दोष सुटका झाली असून ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाल्याने महाभियोगात त्यांना दोषी ठरवत हकालपट्टीची नामुष्की येण्याची शक्यताही कमी होती.
सिनेटने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असलेले आरोप फेटाळून लावत त्यांची निर्दोष सुटका झाली असून रिपब्लिकन पक्षाने ५२-४८ च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तर काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ५३-४७ मतांनी ट्रम्प यांना निर्दोष ठरवण्यात आले असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज’कडून आला होता. तसेच त्या सभागृहात विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असून सभागृहाने ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाचे दोन आरोप निश्चित केले होते.
त्यांनी अधिकारांचा व्यक्तिगत आणि पक्षाच्या स्वार्थासाठी गैरवापर केला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून ट्रम्प यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. तर अमेरिकी सरकारने युक्रेनला ३९१ दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली. पण ट्रम्प यांनी जो बिडेन आणि त्यांच्या मुलाच्या युक्रेनमधील व्यावसायिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या काळात युक्रेन सरकारवर दबाव आणत मदतीची रक्कम प्रत्यक्ष देण्याचे थांबवले. ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या तयारीसाठी ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज’ने चौकशी सुरू असताना त्यासाठी सभागृहाने ट्रम्प प्रशासनाकडून काही कागदपत्रांची मागणी करून काही अधिकाऱ्यांना साक्षीसाठी समन्स काढली. पण ट्रम्प यांनी ही कागदपत्रे व साक्षीदार रोखून धरली.