वॉशिंगटन : वृत्तसंस्था- येमेनमधील अरब पेनिसुला (AQAP) या दहशतवादी संघटनेचा नेता कासीम अल-रेमी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली गेली. जे कोण कासिम अल-रेमीविषयी माहिती देईल त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 71 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तसेच अमेरिकेच्या या हल्ल्यात अल कायदाचा नेता आयमान अल-ज़वाहिरीही ठार झाला आहे. कासिम अल-रेमी हा जिहादी संघटना AQAP अरब पेनिसुला चे नेतृत्व २०१५ पासून करीत होता.
अलीकडच्या काळात ही तिसरी वेळ आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेवर निशाणा साधणार्या तीन जणांची हत्या केली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने इसिस या दहशतवादी संघटनेचा नेता अबू बकर अल बगदादी याला ठार मारले होते. या वर्षी जानेवारीत ट्रम्प यांनी बगदागमध्ये इराणच्या कुड्स फोर्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांची हत्या केली.
कासिम अल-रमी कोण होता ?
कासिम अल-रेमी बर्याच दिवसांपासून ट्रम्प यांच्या निशाण्यावर होता. जानेवारी 2017 मध्ये अमेरिकन सैन्याने येमेनमधील अल कायदाच्या आवारात छापे टाकले. या काळात काही अमेरिकन सैनिकही मारले गेले, परंतु अल-रेमी या हल्ल्यापासून बचावला. नंतर, कासिमने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत 11 मिनिटांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यात म्हटले की, कासीम सापडला नाही ट्रम्प यांच्यासाठी जबरदस्त चपराक आहे. आहे . आता अमेरिकेकडून त्याचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल-रेमीने नौदलातील तळावरील हल्ल्याची जबाबदारी घेत 18 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या गोळीबारात हल्लेखोरांसह 4 जण ठार झाले. याशिवाय सुरक्षा दलाशी संबंधित 8 अधिकारीही जखमी झाले होते.