वॉशिंग्टन वृत्तसंस्था : जम्मू – काश्मीर संदर्भातील कलम ३७० हटविल्याबाबत अमेरिकेतील खासदार टॉम सुझ्झी याने भारताविरुद्ध वक्तव्य केलं . ज्यामुळे अमेरिकेतील भारतीय नागरिक चांगलेच संतापले . त्यानंतर या खासदाराने भारतीय नागरिकांची माफी मागीतली. टॉम सुझ्झी याने काश्मीर मधील परिस्थिती विषयी आणि अधिकारांविषयी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो यांना पत्र लिहून भारताविषयी द्वेष व्यक्त केला होता. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं कि, “जम्मू काश्मीरच्या स्वायत्ततेवरील नवीन आदेश हा दहशतवादाला बळ देणार आहे . ज्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते.”
हे पत्र माध्यमांनी दाखविल्यानंतर अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी तीव्र विरोध केला. कारण टॉम सुझ्झी याना निवडून देण्यात भारतीय नागरिकांचा मोठा वाटा होता, भारतीयांनी टॉम सुझ्झी यांचा प्रचारही केला होता. भारतीयांनी दाखविलेल्या या तीव्र संतपानंतर टॉम सुझ्झी यांनी लगेच 100 भारतीय प्रतिनिधींची बैठक बोलावली आणि परराष्ट्र सचिवांना पाठविलेले पत्र परत बोलविण्यात यावं , अशी मागणी भारतीय नागरिकांकडून करण्यात आली . त्यानंतर टॉम सुझ्झी यांनी माफी मागितली. टॉम सुझ्झी यांनी सांगितले कि, “माझ्या वैक्तिक जीवनात मी नेहमी भारतीय आणि भारतीय सार्वभौम्याला पाठींबा केला आहे. दहशतवादाविरोधीच्या भारताच्या लढाईत मी कायम भारता बरोबर आहे. येत्या काही वर्षात भारत – अमेरिका संबंध अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि हे संबंध सुधारण्यासाठी अमेरिकन काँग्रेस नेहमी प्रयत्नशील आहे. ”
अमेरिकेतील भारतीय समुदात समितीचे अध्यक्ष जगदीश सेहवानी यांनी टॉम सुझ्झी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं स्वागत करत , योग्य प्रतिक्रिया असल्याचं म्हंटल आहे. तसेच टॉम सुझ्झी यांनी माईक पॉम्पियो यांना पत्र लिहून, माईक पॉम्पियो यांच्याकडूनही अशीच प्रतिक्रिया यावी , अशी आशा व्यक्त केली आहे. अमेरिकेत भारतीयांचा दबदबा मोठ्या प्रमाणात आहे. भारतीयांची ताकद अमेरिकेत मोठी मानले जाते. अमेरिकन राष्ट्रांध्यक्षांच्या २०१६ च्या निवडणुकीत ही डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय नागरिकांशी जवळीक साधली होती. त्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रचारही केला होता. अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्येही मोदींची लाट आहे.