बहुजननामा ऑनलाईन – तुम्ही कधी कोणत्या परदेशातील नागरिकाला भारतीय राष्ट्रगीत सादर करताना पाहिल आहे का, नाही ना…. पण अमेरिकेच्या सैन्यदलाच्या बॅंडपथकाने चक्क भारतीय राष्ट्रगीत सादर केले आहे. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअरदेखील केला आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रगीतावेळी तेथील सैन्यातील पुरुषांसह महिलांनीही भाग घेत बॅंडवर स्टेप बाय स्टेप सादरीकरणही केले आहे.
सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टन मधील लुईस मॅककॉर्ड मध्ये भारत अमेरिकेच्या सैन्यात २०१९ चा संयुक्त युद्धाभ्यास सुरु आहे. संयुक्त युद्धाभ्यासाच्या दरम्यान हा व्हिडीओ असून अमेरिकी सैन्याने भारतीय राष्ट्रगीताचे सादरीकरण करणे हा दोन्ही देशातील चांगल्या संबंधांचे शुभसंकेत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत अमेरिकेने सैनिकांचा एक दल भारतीय राष्ट्रगीतावर आपला बॅन्ड सादर करीत आहे. या सादरीकरणाची खास बाब म्हणजे केवळ पुरुषच नव्हे तर अमेरिकन महिला सैनिकांनीही यात भाग घेत त्या बँडवर स्टेप बाय स्टेप सादरीकरण करत आहेत. सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या युद्धाभ्यासाला ‘ युद्ध अभ्यास २०१९’ असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे भारत आणि अमेरिकेच्या एकमेकांना सैन्य आणि संरक्षण सहकार्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे.
#WATCH USA: American Army band playing Indian National Anthem during the Exercise Yudh Abhyas 2019 at Joint Base Lewis, McChord. pic.twitter.com/J9weLpKD3X
— ANI (@ANI) September 19, 2019
Visit : bahujannama.com