नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०२० ची सुरुवात जगातील मोठ्या हालचालींसोबत झाली असून अमेरिकेतील एका ग्रुपने २०२० मध्ये जगासमोर कोणती आव्हाने उभी राहतील याचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जगातील पाचव्या मोठ्या भूराजकीय जोखमीच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये देशात सांप्रदायिक अजेंडे, घसरती अर्थव्यवस्थेला आधार बनवला गेला आहे. अमेरिकन एजन्सी दरवर्षी अशी यादी प्रसिद्ध करत असून ही अमेरिकेतील सर्वात प्रभावी जोखीम मूल्यांकन कंपन्यांपैकी एक आहे. भारताविषयी या अहवालात ‘नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत सामाजिक विषयांवर आपली दुसरा कार्यकाळ घालवला आहे. तर देशाचा आर्थिक अजेंडा मागे राहिला आहे. त्याचा परिणाम सन २०२० मध्ये दिसून येईल. केवळ परराष्ट्र धोरणेच नाही तर आर्थिक धोरणदेखील सोडले जाईल,’ असे लिहिले आहे.
एजन्सी मध्ये असेही लिहीले आहे की, ‘मागील काही दिवसात मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा घालवला. ईशान्येकडील घुसखोरांवर कडकपणा दाखवला. धर्माच्या आधारावर निर्वासितांना नागरिकत्व दिले. आणि या सगळ्या निर्णयामागे सर्वात मोठा हात हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा आहे.’
तसेच रिपोर्टमध्ये लावलेल्या अंदाजानुसार यावर्षात देशात धार्मिक विषयामुळे वातावरण तापेल, ज्याचा परिणाम खालच्या स्तरापर्यंत दिसून येईल, याशिवाय जम्मू-काश्मीर, आर्थिक आघाडीवरही सरकारपुढे आव्हाने असतील. भारताच्या या चित्राचा परिणाम जगावर होईल आणि परराष्ट्र धोरणाला याचा फटका बसेल. या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू राष्ट्र या मुद्द्यांवरही चर्चा केली गेली आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, तिथे निर्बंध लागू करणे, त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा यांच्यामुळे जगभरात चर्चा चालू आहे. तसेच अमेरिका आणि ब्रिटिश माध्यमे या कायद्यांना घेऊन सतत भारत सरकारवर टीका करत आहे. या यादीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर असून जगासाठी सर्वात मोठे राजकीय आव्हान हे अमेरिकेतील यंदा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणूका आहेत.
रिपोर्टमधील टॉप पाच राजकीय आव्हाने पुढीलप्रमाणे असतील.-
१. अमेरिकेवर कोण राज्य करणार?
२. अमेरिका आणि चीनमध्ये तांत्रिक युद्ध
३. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध
४. हवामान बदल आणि त्यात डाव्या क्रांतीची भूमिका
५. भारत मोदीमय होणे.