युपीएससी (UPSC) NDA नोटिफिकेशन 2019 : १२ वी पास असणाऱ्यांना लष्कर, नोदलात अधिकारी होण्याची संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. य़ुपीएससीने यासंदर्भातील नोटीफिकेशन जारी केले आहे. NDA/NA Exam (||) 2019 चे अधिकृत नोटीफीकेशन जारी करण्यात आल्या आहेत.
एनडीए/एनए च्या एकूण ४१५ जागांसाठी प्रवेश मिळणार आहे. त्यात ३७० जागा राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि ४५ जागा या नेवल अकादमीसाठी असतील. यासाठी १०+२ पात्रता आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेबर, २०१९ आहे. तर परीक्षा १७ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.
पात्रता
१०+२ म्हणजेच बारावी (विज्ञान, गणित विषयासह)
१२ वीच्या वर्गात शिकणारे किंवा १२ वी पास विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
वयाची अट – २ जानेवीर २००१ ते १ जानेवारी २००४ दरम्यान जन्मलेले, ज्यांचे वय १५ ते १८ वर्षे आहे.
फीस –
खुला प्रवर्ग – १०० रुपये
एससी एसटी, माजी सैनिकांचे पाल्य यांना फी मधून सुट
जागा – ४१५
एनडीए – ३७०( लष्कर -२०८, नौदल आणि नौदल ४२, हवाई दल १२०), नेवल अकादमी (एनए) – ४५
महत्वाच्या तारखा –
अर्जाची ऑनलाईन नोंदणी सुरु – ७ ऑगस्ट, २०१९
अर्जाची शेवटची तारीख – ३ सप्टेबर, २०१९
कॉल लेटर – ऑक्टोबर २०१९ (परीक्षेच्या तीन आठवड्याआधी)
परीक्षेची तारीख – १७ नोव्हेंबर
अर्जासाठी अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
Comments are closed.