UPI Payments Without Internet | विना इंटरनेट सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट, जाणून घ्या सोपी पद्धत

UPI Payments Without Internet | how to make online upi payments without internet connection know simple steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPI Payments Without Internet | ऑनलाईन ट्रांजक्शन (Online transactions) बहुतांश यूजर्समध्ये वेगाने वाढत आहे. अनेक लोक आपल्या मोबाईलवरून इंटरनेटच्या मदतीने यूपीआय (UPI) किंवा ऑनलाइन ट्रांजक्शन करतात. अनेकदा आपण अशा ठिकाणी असतो जेव्हा मोबाईलचे इंटरनेट काम करत नाही. (UPI Payments Without Internet)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

इंटरनेट नसल्याने Google-Pay, Phone-Pay or other UPIs द्वारे पेमेंट करण्यात अडथळे येतात. अशावेळी जर तुम्ही इंटरनेटच्या समस्येने त्रस्त होत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी आयडिया देणार आहोत ज्यामध्ये विना इंटरनेट सहजपणे यूपाअय पेमेंट करू शकता (UPAY payment without internet).

 

असेही करू शकता यूपीआय पेमेंट
UPI 123PAY साठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यकता नाही. ही सर्व्हिस विविध भारतीय भाषांमध्ये वापरू शकता. नवीन सुविधेसह स्मार्टफोन आणि फिचर फोन यूजर दोघे यूपीआय पेमेंट करू शकतात. UPI 123PAY सर्व्हिसचा वापर करण्यासाठी यूपीआय आयडी बनवणे आवश्यक आहे.

 

फोनवर एक यूपीआय आयडी बनवण्यासाठी *99# डायल करा. नंतर तुमच्या बँकेचे नाव निवडा आणि डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक टाका. आपला यूपीआय पीन सेट करा. आयडी बनवल्यानंतर यूपीआय आयडी अ‍ॅक्टिव्ह होईल.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

असा करा UPI 123PAY चा वापर
आपल्या फोनवर आयव्हीआर नंबर 08045163666 डायल करा. आयव्हीआर मेनूमध्ये, आपल्या पसंतीची भाषा निवडा. आपल्या यूपीआयसंबंधीत बँक निवडा. डिटेल्स चेक केल्यानंतर 1 दाबा. ज्यास पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर टाका. आपल्या यूपीआय पिन टाका आणि सेंड बटन दाबा. पैसे ट्रान्सफर होतील.

 

स्टार99हॅश वरून सुद्धा करू शकते विना इंटरनेट पेमेंट
जे लोक स्मार्ट फोन वापरत नाहीत आणि ज्यांच्याकडे इंटरनेट सर्व्हिस सुद्धा नाही, ते बेसिक फोनवरून *99# डायल करून यूपीआय पेमेंट करू शकतात. यासाठी केवळ एकदा यूपीआय अ‍ॅपरवर आपले अकाऊंट बनवावे लागेल. यासोबतच आपला योग्य फोन नंबरच बँक अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

 

देशात सर्व मोबाईल कंपन्या आपल्या नेटवर्कवर *99# ही सर्व्हिस पुरवतात. याचे कारण हे आहे
की, ही एक अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस आहे. ही *99# सर्व्हिस हिंदी आणि इंग्रजीसह 13 भाषांमध्ये अ‍ॅक्सेस केली जाते.

 

फोनवर दिसतील हे ऑपशन
जेव्हा तुम्ही स्टार99हॅश डायल कराल तेव्हा एक मेन्यू ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला माय प्रोफाईल, सेंड मनी, रिसिव्ह मनी, पेंडींग रिक्वेस्ट, चेक बॅलन्स, यूपीआय पीन आणि ट्रान्झक्शन सारखे पर्याय दिसतील.
तुम्हाला यापैकी एक ऑपशन निवडावा लागेल. त्याच्या समोर लिहिलेला आकडा मोबाईलवर डायल करावा लागेल.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यानंतर यूपईायवरून पैसे पाठवण्याचा ऑपशन निवडावा लागेल. नंतर तो ऑपशन सिलेक्ट करावा लागेल,
ज्यामध्ये तुम्ही रिसिव्हरला यूपीआयद्वारे पेमेंट पाठवणार आहात. नंतर जेवढे पैसे तुम्हाला पाठवायचे आहेत,
ती रक्कम टाका. आणि सेंड बटन दाबा. या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवळ 50 पैसे चार्ज द्यावा लागेल.

 

Web Title :- UPI Payments Without Internet | how to make online upi payments without internet connection know simple steps

 

हे देखील वाचा :

Pune Police | हॉटेल प्यासा येथे तरुणावर सत्तुराने वार, फरार झालेल्या 4 आरोपींना अटक

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एकाच अटीवर वेतनाशिवाय मिळतील 30 हजार रुपये; जाणून घ्या

WhatsApp Double Verification Code | WhatsApp होणार आता आणखी सुरक्षित, डबल व्हेरिफिकेशनसह मिळेल Undo चे ऑपशन