बहुजननामा ऑनलाइन टीम – यावर्षी व्हॉट्सअॅपवर बरेच नवीन फीचर्स आले आहेत. काही फिचर्स प्रायवसीवर फोकस करत आहे, तर काही फिचर्स यूजर इंटरफेसशी संबंधित आहे. आता हा ग्रुप पूर्वीपेक्षा अधिक खाजगी बनविला गेला आहे आणि कोणीही तुमच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये सामिल होऊ शकत नाही.
2020 मध्ये, कंपनी काही नवीन वैशिष्ट्ये आणण्याच्या तयारीत आहे जी व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव बदलून टाकेल. यातले सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे डार्क मोड असू शकते परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे Disappearing Message असू शकते.
अहवालानुसार या दोन्ही व्हॉट्सअॅपच्या फिचर्सची टेस्टिंग घेण्यात येत आहे. अँड्रॉइड अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये डार्क मोड देण्यात आला असून त्याअंतर्गत तीन पर्याय दिले आहेत.
मल्टिपल डिवाइस सपोर्ट –
कंपनी काही काळ या फिचर्सवर कार्य करीत आहे. अशी अपेक्षा आहे की, हे फिचर्स 2020 मध्ये येईल. याअंतर्गत एकाचवेळी एकापेक्षा जास्त डिवाइस किंवा स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप अकाउंट चालवले जाऊ शकते.
स्टेटस फॉर क्लोज फ्रेंड्स –
इन्स्टाग्रामने असे फिचर्स दिले आहे. जवळच्या मित्रांसाठी कस्टम स्टेटसचा पर्याय व्हॉट्सअॅपवरही देता येईल.
इन अॅप ब्राउझर-
व्हॉट्सअॅपमध्ये या अॅप ब्राउझरचा पर्यायही 2020 मध्ये दिला जाऊ शकतो. हे प्रथम Android Beta वर्जनमध्ये पाहिले होते. त्याअंतर्गत लिंक उघडण्यावर व्हॉट्सअॅपच्या इंटरफेसच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.
सर्च इमेज फीचर –
व्हॉट्सअॅप देखील एका फीचरची टेस्टिंग घेत आहे. ज्याअंतर्गत युजर्स व्हॉट्सअॅपवर पाठविलेल्या इमेजचा सहज शोध घेऊ शकतात. असे म्हटले जात आहे की, हे फिचर्स गुगल इमेज सर्चचा वापर करेल.
बुमरॅंग फिचर्स –
इन्स्टाग्राम युजरनला हे फिचर्स माहित असेलच. व्हिडिओ लूप तयार करण्याचे हे फिचर आहे. अहवालानुसार व्हॉट्सअॅप अँड्रॉइड युजरसाठी व्हॉट्सअॅप देणार आहे. हे 2020 मध्ये देखील जारी केले जाऊ शकते.