लखनऊ : वृत्तसंस्था – बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी क्रूर घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. गोरखपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापच आपल्या मुलीवर गेले दोन वर्षे सतत बलात्कार करत होता, आणि नंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली. २६ जुलै रोजी आरोपीने आपल्या मुलीची हत्या केली. आरोपीला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १५ वर्षांपूर्वी आरोपीच्या पत्नीचे निधन झाले होते, पीडित मुलगी हि १९ वर्षाची आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस अश्या घटनांना उधाण आले आहे, काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथील एका युवकाला आपल्या आठ वर्षाच्या मुलीवर कित्येक महिने रेप करत असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पीडित मुलगी चौथीच्या वर्गात शिकत होती, तिने हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. एसीपी समशेर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काही दिवसांपासून भयग्रस्त स्थितीत वावरत होती. यासंदर्भात शेजारच्यांनी विचारल्यास लैंगिक अत्याचाराची हि घटना या उघडकीस आली.
आरोपी हा पीडित मुलीसोबत पटौदी परिसरात राहत होता. मुलीच्या आईच्या मृत्यू नंतर गेली कित्येक महिन्यांपासून आरोपी हा मुलीवर लैंगिग अत्याचार करत होता. पीडित मुलीने सांगितले कि, आरोपी दारू पिऊन आल्यावर नेहमी तिचे लैंगिक शोषण करत. गेल्या आठवड्यातही तिच्या वर दोन वेळा बलात्कार करण्यात आला. सध्या मुलीची तेथून सुटका करून तिला काउंसलिंग सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
नुकतीच अशीच एक घटना उत्तर प्रदेशातीलच अटारी गावातून समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकानेच बलात्कार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हि घटना समोर आली. सध्या तिला दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. एसीपी विनीत जैस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची तब्येत काही दिवसांपासून खराब होती, म्हणून तिच्या आजीने तिला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजीने या संदर्भात विचारणा केल्यानंतर पीडितेने सांगितले कि, गेल्या काही महिन्यापासून तिचा काकाच तिचे लैंगिक शोषण करत होता. आरोपी काका विरुद्ध आजीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.