बुलंदशहर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात प्रेम प्रकरणात आत्महत्या आणि हत्येचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे एक भाऊ आपल्या बहिणीच्या प्रेम प्रकरणात अडथळा बनला होता. यामुळे त्रासलेल्या बहिणीने आत्महत्या केली. जेव्हा तरुणीच्या प्रियकराला हे समजले तेव्हा त्याने प्रेयसीच्या भावाला गोळी मारून ठार केले.
ही घटना बुलंद शहराच्या सिकंदराबदर परिसरातील आहे. जेथे गुरुवारी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. मृताच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केले आहे. एफआयआरमध्ये छेडछाड केल्याने आणि विवाहासाठी दबाव आणल्याने त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे आणि आरोपीने मुलाची हत्या केल्याचे म्हटले आहे.
परंतु, पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, आरोपी आणि मृताच्या बहिणीमध्ये प्रेमसंबंध होते. ज्यामध्ये मृत तरुणीचा भाऊ अडथळा होता. यामुळे त्रासलेल्या तरुणीने आत्महत्या केली होती. यानंतर तरुणीच्या प्रियकराने भावाची हत्या केली. सध्या दोन आरोपी आणि एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी आणि अज्ञात फरारी आहेत, तर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मृताचे नाव रामवीर आहे. त्याच्या वडिलांनी सिकंदराबाद ठाण्यात प्रकरण नोंद केले आहे. एफआयआरनुसार आरोपी आकाश त्यांच्या घरी ये-जा करत होता आणि त्यांच्या मुलीवर वाईट नजर ठेवत होता. तसेच छेडछाड करत होता. लग्नासाठी दबाव आणत होता. हे समजल्यानंतर त्यांचा मुलगा रामवीरने आकाशला समज दिली होती की, असे करू नये. परंतु, आकाशने ऐकले नाही. यामुळे त्रासलेल्या त्यांच्या मुलीने 8 नोव्हेंबरला विष पिऊन आत्महत्या केली.
याचा राग मनात धरून आकाशने तरुणीचा भाऊ रामवीरशी शत्रुत्व सुरू केले आणि 12 तारीखेच्या सकाळी त्याने रामवीरच्या घरी जाऊन किराणा सामान मागण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडला आणि रामवीरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.