बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एक लाजीरवाणी घटना उघडकीस आली असून, शाळेच्या चेयरमनने फी जमा न केल्याने विद्यार्थ्याच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यासोबतच आरोपीला अटक करुन तुरूंगात टाकण्यात आलं आहे.
टीसी देण्याच्या बहाण्याने शाळेच्या चेयरमनने तिला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. इकोटेक -3 परिसरातील पोलिसांनी पीडित मुलीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला असून आरोपी चेयरमनला अटक केली.
या महिलेचे म्हणणे आहे की तिचा भाऊ आठवीत शिकणारा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनमुळे फी जमा करता आली नाही, त्यानंतर शाळेच्या मालकाने फी वसूल करण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. 20 वर्षीय बहिणीने अनेकदा शाळेच्या मालकाची भेट घेतली आणि कुटुंबातील आर्थिक अडचणी बद्दल सांगितले.
या मुलीने पुढे पोलिसांना सांगितले की 4 सप्टेंबर रोजी पुन्हा तिच्या भावाच्या शाळेची फी माफ करण्याची मागणी करण्यासाठी ती शाळेत गेली. त्यानंतर नीरज भाटी या आरोपीने आपल्यासोबत बलात्कार केल्याचं त्या मुलीने सांगितलं. इतकेच नाही तर शाळेच्या चेयरमनने कुटुंबीयांना घटनेविषयी सांगू नका असे सांगितले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पण घाबरलेल्या पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना ही माहिती दिली.
याबाबत नातेवाइकांनी पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी पाठवले आहे. डीसीपी महिला वृंदा शुक्ला म्हणाल्या की आरोपींनी विद्यार्थिनीच्या बहिणीला टीसी देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. त्याचवेळी आरोपी चेअरमनने बलात्कार केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.