लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रेदशातील बलियाचे जिल्हाधिकारी भवानी सिंह सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून देशातील तसेच परदेशातील लोक त्यांना बूट पाठवत आहेत. इतकेच नाही तर काही लोक तर त्यांना गाड्या आणि घड्याळही पाठवत आहेत. #ShoesForTheDM या हॅशटॅगचा वापर करून लोक भवानी सिंह यांना ट्रोल करत आहेत. त्यांनी दलित समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दलित समाजाने त्यांच्याविरोधात मोहिम छेडली आहे.
Can we send some #ShoesForTheDM? Can anyone get the address of Ballia, UP DM and we can send him some shoes. He is so jealous that Dalits are wearing nice shoes and clothes. Send #ShoesForTheDM, dirtiest shoes would be better for him! https://t.co/A3sTuhLSDT
— Pardeep (@AmbedkarCaravan) August 31, 2019
नेमकं प्रकरण काय ?
बलियाचे जिल्हाधिकारी भवानी सिंह 22 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानंतर बैठक आणि सर्व कामे सोडून सरकारी शाळेत पोहोचले. यावेळी काही दलित नेतेही तेथे उपस्थित होते. शाळेतील एका व्हिडीओमुळे वाद झाला होता. दलित मुलांना शाळेत बाजूला बसवत मध्यान्ह भोजन दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्विट करत म्हटले होते की, “या प्रकाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने शाळेत पाठवलं होतं.” असे म्हणत त्यांनी योगी सरकारवर निशाणा साधला होता.
First-generation Dalit Entrepreneur KP Singh wears this pair of LV shoes. Costs Rs 2.15lacs. He has Mercedes as well as Jaguar.@cbhanp #DalitsForBaliyaDM @dilipmandal #ShoesForTheDM pic.twitter.com/JRgbWCccDc
— Praveen Kumar Kalsan (@praveen_kalsan) August 31, 2019
जिल्हाधिकारी भवानी सिंह मात्र बसपाच्या नेत्यांना पाहून गरजले आणि म्हणाले की, “महत्त्वाची बैठक सोडून मला येथे यावं लागलं. परंतु तुमच्यासारखे नेते राजकारण करत आहेत. 25 लाखांची गाडी, 20 हजारांचं घड्याळ आणि 10 हजारांचे बूट घालून राजकारण करू नका.” यानंतर बसपाच्या क्षेत्रीय समन्वयकांनी याचा विरोध केला. आरोप प्रत्यारोपाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
First-generation Dalit Entrepreneur KP Singh wears this pair of LV shoes. Costs Rs 2.15lacs. He has Mercedes as well as Jaguar.@cbhanp #DalitsForBaliyaDM @dilipmandal #ShoesForTheDM pic.twitter.com/JRgbWCccDc
— Praveen Kumar Kalsan (@praveen_kalsan) August 31, 2019
यानंतर दलित समाजातील लोक आता भवानी सिंह यांना विरोध दर्शवत आहेत. काहींनी जुन्या बुटांचे फोटो तर काहींनी त्यांना गाडीचे फोटो त्यांना पाठवले आहेत. काहींनी तर बूट खरेदी करून त्यांना कुरिअरही केले आहेत.