बहुजननामा ऑनलाईन टीम : उन्नाव येथील बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या युवकाच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत प्रशासनाला सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलावर होणारे आरोप आणि प्रत्यारोप संशयास्पद आहेत. ज्याची सीबीआय चौकशी आवश्यक आहे.
रविवारी दुपारी बलात्कार पीडितेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर माध्यमांसमोर जात आरोपी तरुणांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलांचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा बलात्कार पीडित मुलगी जाळली गेली होती, तेव्हा ते घरात झोपले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना झोपेतच उचलून नेले होते.
त्यामुळे जर त्यांच्या मुलांचा या घटनेशी काही संबंध असेल तर यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आरोपींच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, यावेळी आपल्या एकुलत्या एका मुलासाठी रडत असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, या घटनेत त्यांचा मुलांचा सहभाग असेल तर त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा द्यावी. प्रसंगी उभे असलेले नागरिक काहीही बोलू शकले नाही.
Visit : bahujannama.com