नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Universal Pension System | मोदी सरकार कर्मचार्यांना लवकरच खुशखबर देऊ शकते. कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय (Retirement Age) आणि पेन्शनची (Pension) रक्कम वाढवण्यावर मोदी सरकार (Modi Government) विचार करत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडून (PMs Economic Advisory Committee) हा प्रस्ताव (Universal Pension System) पाठवण्यात आला आहे. यामध्ये देशात लोकांचे काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत म्हटले आहे. सोबतच या समितीने म्हटले आहे की, देशात युनिव्हर्सल पेन्शन सिस्टम सुद्धा सुरू केली पाहिजे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा
समितीच्या रिपोर्टनुसार, या सूचनेंतर्गत कर्मचार्यांना दरमहिन्याला किमान 2000 रुपयांची पेन्शन (Universal Pension System) दिली पाहिजे. आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगली व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.
स्किल डेव्हलपमेंट आवश्यक
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर कामकाजाच्या वयाची लोकसंख्या वाढवायची असेल तर यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवणे अतिशय गरजेचे आहे.
सामाजिक सुरक्षा प्रणालीवरील दबाव कमी करण्यासाठी असे करता येऊ शकते.
रिपोर्टमध्ये 50 वर्षावरील व्यक्तींसाठी सुद्धा स्किल डेव्हलपमेंटबाबत म्हटले आहे.
सरकारांनी बनवावे धोरण
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारांनी (State Government) अशी धोरणे बनवावी ज्याद्वारे कौशल्य विकास करता येऊ शकतो.
या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम परिसरात राहणारे लोक, रिफ्यूजी, प्रवाशांचा सुद्धा समावेश करता येऊ शकतो. ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नसते, परंतु त्यांनी प्रशिक्षित होणे गरचेचे आहे.
32 कोटी ज्येष्ठ नागरिक
वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस 2019 (World Population Prospects 2019) नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक होतील.
लोकसंख्येच्या सुमारे 19.5 टक्के व्यक्ती सेवानिवृत्तीच्या कॅटेगरीत जातील.
2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरीक कॅटेगरीत आहेत.
Web Title : Universal Pension System | pms economic advisory committee recommend universal pension sys higher retirement age boost to incomesecurity marathi news.