वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – चीनमध्ये सार्ससारख्या नव्या विषाणूमुळे मरणार्यांची संख्या वाढून बुधवारी 9 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात सुमारे 440 केसेस समोर आल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपमंत्री ली बिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनावायरस श्वसनतंत्राद्वारे पसरतो. यामुळे वायरल म्यूटेशन होण्याची म्हणजेच रोग पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान या विषाणुने बाधीत पहिला रूग्ण सापडल्याच्या वृत्ताला अमेरिकेने दुजोरा दिला आहे.अमेरिकेने सिएटलमध्ये या संबंधिची पहिले केस समोर आल्याची घोषणा केली आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने हे प्रकरण गांभीर्याने घेवून आज तातडीची बैठक बोलावली आहे.
अमेरिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी मंगळवारी सांगितले की, चीनमध्ये पसरलेल्या नव्या वायरसशी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे. केंद्र अणि राज्य अधिकार्यांनी सांगितले की, पीडीत रूग्णाचे वय 30 ते 35 वर्षादरम्यान असून तो वुहान येथून अमेरिकेत आला आहे. परंतु, पीडित वुहानच्या सीफूड बाजारात गेला नव्हता, जे सध्या कोरोना वायरसचे केंद्र झाले आहे. त्यांनी सांगितले की, या व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना वायरस चीनच्या वुहान शहरात सुरू होऊन आता चीनमधून बाहेरही पोहचला आहे. विमानतळावर आरोग्य तपासणी आणखी प्रभावी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या अधिकार्याने म्हटले की, नव्या वायरसशी संबंधित एक प्रकरण समोर आल्यानंतर चीनच्या वुहानमधून विमानाने अमेरिकेत येणार्या प्रवाशांची आरोग्य तपासणी आणखी प्रभावी पद्धतीने करण्याची व्यवस्था केली आहे. वायरसने ग्रस्त व्यक्तीला वॉशिंग्टनमध्ये विभागीय उपचार केंद्रात ठेवण्यात आले आहे.
पीडित वॉशिंग्टनच्या स्नोहोमिश काऊंटी येथील राहणारा आहे. पीडित व्यक्ती 15 जानेवारीला सिएटलमध्ये टेकोमा अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. यापूर्वी नव्या वायरसशी संबंधित कोणतीही तपासणी विमानतळांवर सुरू झाली नव्हती. त्याला 19 जानेवारीला उपचार केंद्रात दाखल केले होते. पीडित चीन ते अमेरिका या आपल्या प्रवासात कोण-कोणत्या लोकांच्या संपर्कात आला याची माहिती अधिकारी घेत आहेत. अन्य कुणाला या व्यक्तीमुळे लागण झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. रहस्यमय कोरोना वायरस चीनमध्ये माणसाकडून माणसामध्ये पसरत आहे. तेथे यामुळे काही मृत्यूही झाले आहेत. देशभरात या वायरसने पीडित लोकांची संख्या 300 च्या पुढे गेल्याने देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओने बोलावली आपत्कालीन बैठक
हा वायरस वुहाननंतर बीजिंगसह चीनच्या अन्य शहरात पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यावर आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या संकटावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, वुहान आणि अन्य ठिकाणी पसरलेल्या नव्या कोरोना वायरस निमोनियाला गांभीर्याने घेतले पाहिजे. चीनमध्ये तज्ज्ञ दलाच्या प्रमुखांनी सरकारला आवाहन केले आहे की, या वायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात यावेत. जिनेव्हा येथून मिळालेल्या माहितीनुसार डब्ल्यूएचओ आपल्या बैठकीत ठरवेल की कोरोना वायरसमुळे पसरणार्या आजाराला अंतरराष्ट्रीय आरोग्य आपत्काल घोषित करणे जरूरी आहे अथवा नाही.
वुहानमध्ये आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली असून आतापर्यंत येथे 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. 25 लोकांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे. परंतु, 900 पेक्षा जास्त लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. चीनच्या उपचार आणि आरोग्य आयोगाने कोरोना वायरस संक्रमित न्यूमोनियावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे म्हटले आहे. परंतु, नव्या वायरसच्या संक्रमणाचा स्रोत अद्याप सापडलेला नाही आणि संक्रमणाचे माध्यम अद्याप पूर्णपणे समजलेले नाही, यामुळे वायरसच्या म्यूटेशनवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
कोरोनावायरसमुळे धास्तावलेल्या अनेक देशांसह भारतानेही आपल्या विमानतळांवर तपासणीची व्यवस्था केली आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकातासह देशतील सात विमानतळांवर चिनमधून येणार्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तपासणीची व्यवस्था चेन्नई, बेंगळुरु, हैद्राबाद आणि कोचीनमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. या विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रवांशांची तपासणी होत आहे. हाँगकाँगसह चीनहून येणार्या विमानांमध्ये घोषणा केली जात आहे की, ताप अथवा सर्दीचे लक्षण असलेल्या व्यक्ती आणि जो मागील 14 दिवसात वुहानमध्ये गेला असेल अशा प्रवाशांनी विमानतळावर पोहचताच त्याची माहिती द्यावी.
Visit : bahujannama.com