नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय नेतेमंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता मोदी सरकारमधील केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती जावडेकर यांनी ट्विट करून दिली आहे.
I have tested #COVID positive today. All those who have come in contact with me in the last 2-3 days may please get themselves tested.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 16, 2021
देशात वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेची बाब बनत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. मात्र, अनेकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच आता प्रकाश जावडेकर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले होते. त्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी’.
काळजी घ्या साहेब व लवकर बरे व्हा
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 16, 2021
दरम्यान, आत्तापर्यंत अनेक राजकीय नेतेमंडळींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते रामदास कदम, काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.
I pray for your speedy recovery @PrakashJavdekar ji.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 16, 2021
नितीन गडकरी यांच्यासह अनेकांकडून प्रार्थना
प्रकाश जावडेकर यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह केशव उपाध्ये यांनी ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे. तसेच त्यांच्यासह अनेक नेटझन्सनेही नितीन गडकरी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.