नागपूर बहुजननामा : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तत्कालीन वित्तमंत्री यांच्याकडे एका रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरास तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफासर केली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची भूमिका हि आडमुठेपणाची असते, त्यांच्या या अश्या वागण्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो . त्यामुळे “हा गव्हर्नर चांगला नाही त्याला लगेच बडतर्फ करण्यात यावे, ” अशी मागणी मी केली होती. रविवारी गडकरी यांनी नागपुरातील दोन सभांमध्ये बोलताना याविषयी सांगत होते.
दरम्यान त्यांनी “त्या” गव्हर्नर किंवा वित्तमंत्र्यांबद्दल काहीच नाही सांगितले. गव्हर्नराचे मन वळविण्याचा मी फार प्रयत्न केला , पण ते त्यांच्या भूमिकेवर अडून राहिले .नंतर मला वित्त मंत्र्यांनी सांगितले कि , त्या गव्हर्नरानीं राजीनामा देण्याची धमकी देखील केली. परंतु यांनी प्रत्यक्षात तसे केले नाही, नंतर मीच बोललो कि , “जर ते स्वतः जाणार नसतील तर मी त्यांना हाकलून लावेल, ते चांगले नाहीत.”
रालोआच्या पहिल्या काळात अरुण जेटली आणि पियुष गोयल यांच्याकडे वित्त मंत्री पदाचा कार्यभार होता. त्यांच्या काळात रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद सांभाळले होते. राजन याना पुन्हा संधी मिळाली नाही, तर उर्जित पटेल यांनी आपला गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपण्याआधीच पदाचा राजीनामा दिला. परंतु गडकरी यांनी ‘त्या’ दोघांच्या नावाचा उल्लेख न करता , फक्त ‘वित्तमंत्री’ आणि ‘रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर’ असाच उल्लेख केला . तसेच गडकरी यांनी रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कडून बँकिंग क्षेत्रात सकारात्मक भूमिका दर्शवतील, अशी आशा देखील व्यक्त केली आहे.