Union Budget 2024-25 | ‘बजेट’ मध्ये महाराष्ट्राकडे दुर्लक्ष; राज्यातील खासदारांचे आंदोलन
पुणे : Union Budget 2024-25 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा नसल्याने संतप्त महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. काँग्रेस (Congress MP), शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार यात सहभागी झाल्याचे दिसून आले.
यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) होणार आहे. येत्या काहीच महिन्यात निवडणुका होणार असल्याने मोदी सरकार अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा करण्याची अपेक्षा होती. पण, अर्थमंत्र्यांनी संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणात महाराष्ट्रासाठी घोषणा तर लांब पण साधा उल्लेखही केलेला नाही. महाराष्ट्रातील मुंबईही राज्याची आर्थिक राजधानी असतानाही अर्थसंकल्पात त्याबाबत कुठलीही घोषणा केली नाही.
केंद्र सरकारने बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मोठी तरतूद केली. परंतू महाराष्ट्रसाठी विशेष काही ही दिले नाही. तसेच मुंबईच्या वाटेला देखील काहीच मिळाले नाही. त्यामुळे खासदार आक्रमक झाले. वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदि खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारापाशी आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या खासदारांनी मोदी सरकार हाय..हाय.. अशा घोषणही दिल्या. जी राज्ये केंद्रासोबत आहेत त्यांना भरघोस देण्यात आले आहे आणि जे विरोधात आहेत त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप विरोधी गटाने केला आहे.
बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतू महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. बजेटमध्ये दुजाभाव झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
बजेटवरून रोहित पवार यांनी फडणवीसांना डिवचले
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब, तुम्ही अर्थसंकल्प नक्कीच मन लावून बारीक ऐकून नोट डाऊन केला असला तरी दुर्दैवाने या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही नसल्याने तुमची देखील निराशाच झाली असेल, अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीसांनी डिवचले आहे.
Comments are closed.