नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी 2020 – 21 चे केंद्रीय बजेट सादर केले. या बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु, काही घोषणा अशा आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी आवश्यक वस्तू महाग होणार आहेत. याबाबत जाणून घेऊयात.
या वस्तू झाल्या महाग
फुटवेअर : आगामी काळात फुटवेअर -चप्पल, सँडलसह अन्य सर्व प्रॉडक्ट महाग होणार आहेत. कारण, सरकारने बजेटमध्ये फुटवेअरच्या सीमा शुल्कात 10 टक्के वाढ केली आहे. यापूर्वी सीमा शुल्क 25 टक्के होते, आता ते वाढून 35 टक्के झाले आहे.
फर्नीचर : आगामी काळात फर्नीचर प्रॉडक्टसुद्धा महाग होणार आहेत. कारण, फर्नीचर वस्तूंवरील सीमा शुल्क 20 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आले आहे. म्हणजे 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.
सिगारेट/ तंबाखू : बजेटमध्ये सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे आगामी काळात सिगारेटसह अन्य तंबाखू प्रॉडक्ट महाग होऊ शकतात. मात्र, वीडीच्या शुल्क दरात कोणताही बदल झालेला नाही.
याशिवाय पेट्रोल-डीझेल, सोने, काजू, ऑटो पार्ट, सिंथेटिक रबर, ऑप्टिकल फायबर, स्टेनलेस प्रॉडक्ट, लाऊडस्पीकर, व्हिडिओ रेकॉर्डर, पीव्हीसी आणि टाइल्ससुद्धा महाग होऊ शकतात.
सीसीटीव्ही कॅमेरा : तर एसी, सीसीटीव्ही कॅमेरा, गाडीचे हॉर्नसारखे प्रॉडक्टसुद्धा महाग होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, इम्पोर्टेड मेडिकल डिव्हाईससुद्धा महाग होणार आहेत.
या वस्तू झाल्या स्वस्त : कापड क्षेत्राला चालना देण्यासाठी प्यूरिफाईड टेरापॅथिक अॅसिड (पीटीए) वर डंपिंगरोधी शुल्क बंद करण्यात करण्यात आले आहे. न्यूज प्रिंट आणि हलक्या कोटेड पेपरच्या आयातीवर मुळ आयात शुल्क 10% टक्क्यांवरून कमी करून 5% केले आहे. फ्यूज, रसायन आणि प्लास्टिकारख्या कच्च्या मालावर सीमा शुल्कात कपात केली आहे.
याशिवाय कच्ची साखर, जंगली – पशुंवर आधारित उत्पादने, टुना वेत, स्किम्ड दूध, काही अल्कोहलयुक्त पेय पदार्थ, सोया फायबर आणि सोया प्रोटीन यावर देण्यात येणारी सीमा शुल्काची सूट परत घेण्यात आली आहे.