पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूने शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
बाजीराव मोळे (वय 51) हे शहर पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यास होते. सध्या त्यांची नेमणूक ही वाहतूक शाखेत होती. 10 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. आज त्यांचा मृत्यू झाला आहे. स्मिथ भाषी आणि अत्यंत मृदू स्वभामुळे ते परिचित होते. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
वाहतूक शाखेत काहीच महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्त केले होते. त्यापूर्वी ते विशेष शाखेत होते. तर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काही महिने काम केले आहे.