बहुजननामा ऑनलाइन टीम – रिलेशनशिप पुढे जाऊ देण्यासाठी एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. मात्र, काही प्रकारात काही पार्टनर काही काळानंतर नात्याला तेवढे महत्व देत नाहीत. ज्यामुळे कधी-कधी ब्रेकअपची सुद्धा स्थिती येते. बॉडी लँग्वेज एक्सपर्ट जुडी जेम्स यांनी डेली मेल वेबसाइटला असे काही संकेत सांगितले आहेत ज्यावरून समजू शकते की, तुमचा पार्टनर आता नाते पुढे नेण्यास इच्छूक नाही. हे संकेत कोणते ते जाणून घेवूयात…
1 फोनचा जास्त वापर
जुडी सांगतात, रिलेशनशिप संपवणारे फोनचा वापर जास्त करतात. पार्टनरचा सामना कमी करण्यासाठी ते फोनमध्येच गुंतलेले असतात. ते फोनबाबत जास्त सतर्क दिसतात.
2 बोटं वाजवणे आणि पाय हलवणे
टेबल किंवा इतर वस्तू वाजवणे, बोटं वाजवणे, पाय हलवणे किंवा पायांनी आवाज काढणे आणि वारंवार केसात हात टाकणे, हे संकेत सांगतात की, समोरच्यामध्ये काही गोष्टींबाबत धैर्याची कमतरता आहे.
3 जुडी यांच्यानुसार, वारंवार डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करणे, खांदे आणि मानेच्या मांसपेशींचा आवाज काढणे, डोके रगडणे, ओठांवरून जिभ फिरवणे आणि व्यवस्थित न बसणे हे संकेत असू शकतात.
4 स्वताला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे
ब्रेकअप करण्याच्या दबावात काही लोक स्वताला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. जसे की, एखाद्या वस्तूशी खेळणे, स्वताला सावरणे आणि चेहर्याला वारंवार स्पर्श करणे. तसेच ओठ आणि नखं चावणे.
बहुजननामा ऑनलाइन टीम -जुडी म्हणतात, सामान्यपणे कपल्स एकमेकांना टच करतात आणि जवळ राहतात. ब्रेकअपच्या स्थितीत लोक एकमेकांच्या जवळ जाणे टाळतात. एकमेकांच्या जवळसुद्धा बसत नाहीत.
6 डोळ्यांची भाषा
जुडीनुसार, पार्टनरला ब्रेकअप करायचे असेल तर तो डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही. बोलताना खाली पहात राहील किंवा फोनमध्ये काही करत बोलत राहील. तो तुम्हाला तेव्हा पाहतो जेव्हा तुमचे लक्ष त्याच्याकडे नसेल. याचा अर्थ आहे की त्याने स्वताला ब्रेकअपसाठी तयार केले आहे.
7 दोष काढणे
जुडी सांगतात, ब्रेकअप करण्याचे विचार असणारा आपल्या पार्टनरमधील दोष काढत राहतो. जेणेकरून तो ब्रेकअपसाठी स्वताला कमी दोषी मानू शकतो. याशिवाय डोळे फिरवून बोलणे, पार्टनरच्या हातांना झटका देणे आणि छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद घालणे हे सुद्धा बे्रकअपचे संकेत आहेत.