पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लग्नाच्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांकडे आलेल्या व्यक्तीला मारहाण करून त्याची दुचाकी आणि सोन्याची चैन चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास यवत पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चौफुला ते सोरतापवाडी दरम्यान शुक्रवारी (दि.6) रात्री साडेसातच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी साराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून दुचाकी आणि सोन्याची चेन असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिलीप लक्ष्मण चौधरी (वय – 38 रा.सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी माउली उर्फ भावडया उर्फ भाउ मच्छिंद्र बांदल (वय -22, रा. पारगांव, ता. दौंड, जि. पुणे) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चौधरी यांची शाईन आणि सोन्याची चैन जप्त केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुन, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप चौधरी हे त्यांचे पाहुणे स्वप्नील काळे यांच्या लग्नासाठी पारगाव येथे गेले होते. लग्न समारंभ झाल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून सोरतापवाडी येथे जात होते होते. चौफुल्याच्या पुढे याल्यानंतर थंडी वाजू लागल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावून डिकूतून स्वेटर काढत होते. त्यावेळी त्यांच्या जवळ एक अनोळखी व्यक्ती आला. त्यांना तुम्ही कुठले, कोठे चालला अशी विचारणा करून त्यांना ढकलून देत दुचाकी आणि गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागिय पोलीस अधीकारी डॉ. सचिन बारी व यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन लकडे, पोलीस नाईक गणेश पोटे, दशरथ बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल दामोदर होळकर यांच्या पथकाने केली.