नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीमंतांच्या संपत्तीचे मूल्यांकन फोर्ब्स मासिकाने २००८ साली अनिल अंबानी यांचे वर्णन जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती म्हणून केले होते. लोकांना असे वाटत होते की, अनिल अंबानी व्यावसायिक जगात एक स्थापित खेळाडू बनले आहेत आणि त्याच वर्षी अनिल अंबानीच्या पडझड सुरू झाली. पण आज अनिल अंबानीकडे लक्झरी कार, खासगी जेट आणि जहाज असूनही त्यांची संपत्ती मात्र “शून्य” आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर, अनिल अंबानी यांच्या वकिलांनी यूकेच्या कोर्टात दावा केला आहे की दक्षिण मुंबईत अनिल अंबानी यांच्याकडे ११ किंवा त्यापेक्षा जास्त लक्झरी कार, एक खासगी जेट, एक जहाज आणि एक खास समुद्री पेंटहाउस आहे. पण किंमत शून्य आहे. अंबानी यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार २०१२ मध्ये अंबानींची गुंतवणूक सात अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती, ती घटून आज ८९ दशलक्ष डॉलर्स झाली असून जर त्यांच्या देणदारीला जोडले तर ती शून्यावर येईल. २००२ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या निधनाच्या दोन वर्षांनी अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी वेगळे झाले. त्यानंतर मुकेश अंबानी यांना तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्सचा व्यवसाय मिळाला तर अनिल यांना दूरसंचार, वित्त व ऊर्जा हे क्षेत्र मिळाले.
या दोन्ही भावांनी एकमेकांशी स्पर्धा किंवा स्पर्धा न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली असून मुकेश हे टेलिकॉम व्यवसायात पाऊल ठेवणार नाही तर अनिल हे ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्सपासून दूरच राहील. व्यवसाय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी या फाळणीत ज्या गोष्टींचा आग्रह धरला होता त्या सर्व गोष्टी त्यांनी मिळवल्या. सुरुवातीच्या काळात अनिल अंबानीसाठी परिस्थिती अनुकूल असताना काही काळानंतर अनिल अंबानीची पडझड सुरू झाली. मात्र, काही कालावधीनंतर अनिल अंबानी याच्या अधोगतीला सुरूवात झाली. अनिल कौटुंबिक वाटणीनंतर ताबडतोब मोठ्या प्रमाणात पैसा लागणार्या योजना हाती घेऊ लागले. अनिल अंबानी यांचे प्रत्येक उद्योग निर्णय हे महत्वकांक्षेने घेण्यात आले होते, असे जाणकारांचे मत आहे. याशिवाय त्यांना स्पर्धेत कोणत्याही रणनितीशिवाय उडी मारण्याची सवय होती. तसेच अनिल अंबानी यांच्यासाठी २००८ ची जागतिक मंदी मोठा धक्का देणारी ठरली. एका अंदाजानुसार या मंदीमध्ये अनिल अंबानी यांना ३१ अरब डॉलरचे नुकसान झाले. यानंतर अनिल अंबानी ज्या उद्योगात उतरले, तेथे त्यांच्या हाती निराशाच आली. तर मुकेश अंबानी लागोपाठ यशाच्या शिखरावर जात होते.
आज मुकेश अंबानी जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आहेत. तर अनिल अंबानी यांच्यावर ४५ हजार करोडचे कर्ज आणि खटल्यांचा डोंगर आहे. काही दिवसांपूर्वीच अनिल अंबानी यांना स्वीडनची कंपनी एरिक्सनने ५५० करोड रुपये देण्यास सांगितले होते. कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी हे पैसे दिले नाहीत तर त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असे म्हटले होते. मुकेश अंबानी अशा संकटात आपल्या भावाच्या मदतीला धावून आले आणि पैसे भरून त्यांनी भावाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले. आता लंडन कोर्टाने चीनच्या बँकांच्या अर्जावर सुनवाणी करताना अनिल अंबानी यांच्याकडून १० करोड डॉलर जमा करण्यास सांगितले आहे. यासाठी कोर्टाने अनिल अंबानी यांना सहा आठवड्याचा कालावधी दिला आहे. आता हे पैसे अनिल अंबानी कसे जमा करतात हे महत्वाचे आहे.