नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आधार संबंधित UIDAI ने आधार कार्डवरील आपले नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून त्यात आपल्याकडे आपले नाव, पत्ता आणि जन्मतारीखेचे कोणतेही प्रमाणपत्र नसेल तरीही तुम्ही तुमच्या आधार कार्डावरील नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलू शकता. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी UIDAI ने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर याबद्दल माहिती दिली असून कोणतेही वैध प्रमाणपत्र नसले तरी आपण आपल्या आधारावरील माहिती बदलू शकता, अशी माहिती सरकारी संस्थेने दिली आहे.
#AadhaarUpdateChecklist
UIDAI accepts certificate issued by authorized officials for Aadhaar enrolment or Address, Name or Date of Birth update. The standard format for this certificate is available here: https://t.co/BeqUA07J2b pic.twitter.com/oiANmkIqsw— Aadhaar (@UIDAI) January 17, 2020
UIDAU ने केलेल्या विधानानुसार म्हटले आहे की, आधारमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला गट ए आणि गट बी गॅजेटेड ऑफिसर/ ग्रामस्थ/ परिसरातील खासदार, आमदार/ एमसीडी समुपदेशक/ तहसीलदार/ शासकीय संस्थेचे अधिकारी/ अधीक्षक/ वॉर्डन इत्यादीपासून आधार संस्था UIDAI संबंधित एक प्रमाणित प्रमाणपत्रावर माहिती भरून त्यावर सही करून आणावे लागेल.