नवी दिल्ली : युआयडीएआयने आधार कार्ड (aadhaar card) धारकांसाठी आवश्यक महिती दिली आहे. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड(aadhaar card)मध्ये जन्म तारीख बदलायची असेल किंवा घरचा पत्ता अपडेट करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. आधार कार्डचा उपयोग अनेक ठिकाणी होता असतो. अशावेळी चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता असल्यास अनेक समस्या येतात. युआयडीएआयने डॉक्युमेंटची यादी जारी केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, तुम्हाला जन्म तारीख अपडेट करण्यासाठी लागणार्या कादपत्रांची माहिती दिली आहे.
युआयडीएआयने केले ट्विट
युआयडीएआयने आपल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुम्हाला आधारमध्ये आपली जन्म तारीख अपडेट करायची असेल, तर हे तपासून घ्या की तुम्ही वापरलेले डॉक्युमेंट तुमच्या नावे असावेत आणि वॅलिड असावेत.
हे डॉक्युमेंट आवश्यक
युआयडीएआयनुसार, आधारमध्ये ओळखीचा पुराव्यासाठी 32 डॉक्युमेंट स्वीकारले जातात. नाते संबंधासाठी 14 डॉक्युमेंट, जन्म तारखेसाठी 15 आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी 45 डॉक्युमेंट मान्य केले जातात. तपासून पाहुयात या डॉक्युमेंटची यादी –
DOB Documnets
1. बर्थ सर्टिफिकेट
2. पासपोर्ट
3. पॅन कार्ड
4. मार्क शीट्स
5. एसएसएलसी बुक/सर्टिफिकेट
Proof Of Identity (PoI)
1. पासपोर्ट
2. पॅन कार्ड
3. रेशन कार्ड
4. वोटर आयडी
5. ड्रायव्हिंग लायसेंस
Proof of Address (PoA)
1. पासपोर्ट
2. बँक स्टेटमेंट
3. पासबुक
4. रेशन कार्ड
5. पोस्ट ऑफिस अकाऊंट स्टेटमेंट
6. वोटर आयडी
7. ड्रायव्हिंग लायसेंस
8. विज बिल
9. पाणी बिल
मान्य कागदपत्र नसल्यास हे उपयोगी पडेल
युआयडीएआयनुसार, ज्या लोकांकडे स्वताच्या नावावर कोणतेही कागदपत्र नाही, ते युआयडीएआयद्वारे अप्रूव्ह स्टँडर्ड सर्टिफिकेटचा वापर आधार इनरॉलमेंट / नाव, पत्ता, जन्म तारीख अपडेट करण्यासाठी करू शकतात. सर्टिफिकेट ग्रुप अ किंवा इ गॅझेटेड अधिकारी / ग्राम पंचायत प्रमुख किंवा सरपंच मुखिया / एमपी / एमएलए / एमएलसी / म्युनिस्पिल कौन्सिलर / तहसीलदार / एखाद्या मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेचा प्रमुख किंवा सुप्रिटेंडेंट किंवा वॉर्डन किंवा मॅट्रन/मान्यता प्राप्त शेल्टर होम किंवा अनाथालयाच्या इन्स्टीट्यूशनच्या प्रमुखाकडून जारी झाले पाहिजे.