नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनिवर्सिटी ग्रँट कमीशन (UGC) ने सध्याचे सेशन आणि नवीन अॅडमिशनसाठी परीक्षेसाठी गाईडलाईन्स आणि अकॅडमिक कॅलेंडर जारी केले आहे. UGC च्या गाईडलाईन्सनुसार, विद्यापीठांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत फायनल ईयर/सेमिस्टर परीक्षा पूर्ण करावी लागेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
12वी निकालानंतर UG अॅडमिशन प्रक्रिया
युनिव्हर्सिटी अॅडमिशन 2021 साठी, यूजीसीने म्हटले आहे की, विविध विद्यापीठामध्ये युजी अॅडमिशन प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीएसई, आयसीएसई आणि इतर राज्य बोर्डांद्वारे इयत्ता 12 वीच्या निकाल लागल्यानंतर सुरू होईल. नवीन शैक्षणिक सत्र 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल.
आयोगाने 16 जुलै 2021 च्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आशा आहे की सर्व राज्य बोर्डांसोबत सीबीएसई आणि आयसीएसईचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जारी केला जाईल. यासाठी प्रवेश प्रक्रिया त्यानंतर किंवा अस्थायी प्रकारे 1 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल.
30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी
याशिवाय, विद्यापीठांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आणि 1 ऑक्टोबर 2021 पासून नवीन सेशन सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. रिक्त जागा भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे.
तर नवीन सेशनसाठी डॉक्यूमेंट्स 31 डिसेंबर 2021 पर्यंत जमा करता येतील. 12 वीचे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्याच्या स्थितीत उच्च शिक्षण संस्था 18 ऑक्टोबरपासून नवीन अकॅडमिक सेशन सुरू करण्याची योजना बनवू शकते.
31 ऑक्टोबरपर्यंत कॅन्सलेशन चार्ज नाही
कॅलेंडर जारी करण्याशिवाय यूजीसीने हे सुद्धा म्हटले आहे की, महामारी पाहता विद्यापीठ 31 ऑक्टोबरपर्यंत अॅडमिशन परत घेण्यासाठी कोणतेही कॅन्सलेशन चार्ज घेणार नाही. यानंतर, 31 डिसेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास विद्यापीठ प्रोसेसिंग फिच्या रूपात मॅक्सीमम 1000 रुपये कापू शकते.
Web Titel :- ugc ugc released exam guidelines and calendar for university admission
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये