मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे राजकीय विरोधक संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विरोधात कंबर कसण्यासाठी शिंदेंच्या विरोधकांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून बळ दिले जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जून महिन्यात शिवसेनेत बंड झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदार आणि 12 खासदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाला मजबूत करण्यावर भर दिला आहे.
शिंदे यांना रोखण्यासाठी अन्य नेत्यांना ठाकरे बळ देत आहेत.
गुरुवारी यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे.
संजय देशमुख हे संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे राजकीय विरोधक आहेत.
देशमुखांना पक्षप्रवेश घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे.
मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे.
मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा, मी आलोच, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झाले ते पटलेले नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही,
तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक येत आहेत.
तुम्ही फक्त लढा, जे होत आहे, ते आम्हाला पसंत नाही, असे मला लोक सांगत असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
या देशातील लोकशाहीला वाचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील ठाकरे म्हणाले.
तसेच माझे पुढे काय होणार, शिवसेनेचे काय होणार, हे ठरविणारे तुम्ही लोक आहात.
मला त्याची चिंता नाही. मात्र, देशाचे काय होणार, देशात लोकशाही राहणार की नाही हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे, असे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Uddhav Thackeray | sanjay deshmukh joined shivsena uddhav thackeray said will visit poharadevi
हे देखील वाचा :
Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त
Vaibhav Khedekar | मनसेच्या वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवार
Hingoli News | नोटीस पाहण्यासाठी लाचेची मागणी, शेतकऱ्याच्या लेकानं इंग्रजीत काढली खरडपट्टी