मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही,’ असं स्पष्टच शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं. राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी भाजपसह (BJP) एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray On Eknath Shinde)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेना भवनातून संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी प्रथम नव्या सरकारचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी आरे प्रकल्पावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला. “माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका,” असे वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे म्हणत मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका,’ असेही ते म्हणाले.
“मी अडीच वर्षाचा करार करायला तयार होतो. अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा अस ठरलं होतं. याबद्दल गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता.” असं देखील ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. तथाकथिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असे नाही,’ असं स्पष्टच उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही…
“मागील काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या.
माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी असल्याचे ठाकरे म्हणाले.
माझं पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे.
सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कदीही प्रतारणा करणार नसल्याचं,” उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Uddhav Thackeray On Eknath Shinde | former cm uddhav thackeray maharashtra politics eknath shinde is not shivsena cm
हे देखील वाचा :
Pune PMC Water Supply | पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी