Uddhav Thackeray | बारामतीमध्ये CM उद्धव ठाकरे यांचा भाजपवर ‘निशाणा’; म्हणाले – ‘युतीमध्ये 25 वर्षे अंडी उबवली’
बारामती : बहुजननामा ऑनलाइन – Uddhav Thackeray |आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवे. राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही 25-30 वर्षापूर्वी उघडले होते. इनक्युबेशन सेंटर म्हणजे उबवणी केंद्र. पण दुर्दैवाने काय उबवले ते आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठकारे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) लगावला. बारामतीमधील (Baramati) कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरचे (Incubation Center) उद्घाटन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.
https://twitter.com/MahaGovtMic/status/1455420047665426433?s=20
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, राजकारणात एकमेकांचं पटत नाही. ठिकाय नाही पटत. परंतु राजकारणात एकमेकांचं पटत नाही म्हणून अडथळे आणणे ही काय वृत्ती आहे. हे आपलं राजकारण असू शकत नाही. ही आपली संस्कृती असू शकत नाही. तसे आपल्यावर संस्कार नाहीत. विकासकामाला पाठींबा जरी देत येत नसला तरी त्यात विघ्ने तरी आणू नयेत. आपल्याकडे विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्या विघ्नसंतोषींना नेमकं मिळतं काय? असे ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बॉम्ब फोडा पण धुर काढू नका
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थिवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले. दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धुर काढू नका. कारण कोरोना अजून गेलेला नाही, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या बारामतीमधील कामाचं कौतुक केलं. तसेच पुन्हा बारामतीला येणार, दोन्ही मुलांना घेऊन येणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Web Title : Uddhav Thackeray | cm uddhav thackeray slam bjp in baramati of pune district.
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’
Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या
Parambir Singh | जाणून घ्या परमबीर सिंगांचा लेटर बॉम्ब ते अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम
Comments are closed.