मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी उद्धव ठाकरे ठेकेदारांकडून टक्केवारी मागतील, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश यांनी केले. औरंगाबादमध्ये महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता.या कामासाठी औरंगाबाद महानगरपालिकेकडून निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे या कामातही पाच टक्के मागतील, हे ठेकेदार जाणून असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मुंबईतील महापौरांचे जुने निवासस्थान येथे होणार आहे . त्यासाठी काही दिवसांपूर्वीच हा बंगला खाली करण्यात आला होता. या स्मारकाच्या कामासाठी राज्य सरकारने १०० कोटींची तरतूदही केली होती.
ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण 5 टक्के मागेल. https://t.co/dIJ6Z6KeML
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 10, 2019