नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोमवारी आक्रमक झाल्याचे दिसले. संजय राऊत यांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक दिवस आमचीही वेळ येईल, असा इशारा भाजपला (BJP) दिला. काळ नेहमी बदलत असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमची वेळ आली की तुमचे काय होईल याचा विचार करा. आजचे राजकारण बळावर चालले आहे. भाजपला सर्व पक्ष देशातील राज्यांमधून संपवायचे आहेत. आता महाराष्ट्रातील जनता निर्णय घेईल. सरकारविरोधात बोलणार्यांवर बळाचा वापर केला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुष्पा चित्रपटाचा संदर्भ देत म्हणाले – झुकणार नाही
पुष्पा चित्रपटाचा (Pushpa Movie) संदर्भ देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, चित्रपटातच आपल्याला ’झुकूंगा नहीं’ची स्टाईल दिसते, पण संजय राऊत यांनीही तेच केले आहे. मला संजय राऊत यांचा अभिमान आहे. संजय राऊत हे खरे शिवसैनिक (Shivsainik) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे अनुयायी आहेत. विरोधात बोलणार्यांना तुरुंगात पाठवले जात आहे. संविधानाची मोडतोड केली जात आहे. भाजप आज जे काही करत आहे तो सत्तेचा माज आहे. माझ्यासोबत आमदार-खासदार नाहीत, पण निष्ठावंत लोक आहेत. मी मरण्यास तयार आहे, पण झुकणार नाही.
काही लोक हवेत गेले, खरा शिवसैनिक झुकणार नाही
शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख म्हणाले की, राजकारणाला आपण मराठीत बुद्धिबळ म्हणत आलो आहोत, म्हणजेच त्यात बुद्धिमत्ता वापरली जाते. मात्र आता यामध्ये बळाचा वापर केला जात आहे. वेळ नेहमीच सारखी नसते. अशा लोकांचा वाईट काळ नक्कीच येतो. चांगल्या दिवसात तुम्ही कसे वर्तन करता, त्यापेक्षाही वाईट वर्तन लोक तुमच्याशी करतात. ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि इन्कम टॅक्सच्या (Income Tax) माध्यमातून तुम्ही विरोधी पक्षांशी लढत असाल तर लोकशाही कुठे आहे. जे माझ्यासोबत आहेत ते गद्दार होऊ शकत नाहीत. काही लोक हवेत गेले आहेत. असे झुकणारे लोक शिवसैनिक असू शकत नाहीत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे आल्यानंतर संजय राऊत यांच्या घरी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती
ते म्हणाले की, भाजपविरोधात बोलल्याने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे वाईट राजकारण चालू आहे.
संजय राऊत यांची अटक (Arrest) चुकीची असून आमचा पूर्ण विरोध आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमले होते आणि घोषणाबाजी करत होते.
पत्राचाळ प्रकरणी (Patrachal Case) ईडीने रविवारी रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
Web Title : – Uddhav Thackeray | apna time aayega uddhav thackeray attack bjp on sanjay raut arrest
हे देखील वाचा :
Jio चा स्वस्त प्लान ! केवळ 399 रुपयात फ्री मिळेल Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar
Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई