सातारा : Udayanraje Bhosale | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे काही गोष्टींचे शौक निराळेच आहेत. त्यांनी बुधवारी पुण्यातून (Pune) नवीन बीएमडब्ल्यू गाडी विकत घेतली आहे. पुण्यातील बवेरीयन मोटर्स प्रा. लि. (Bavarian Motors Pvt. Ltd.) येथून त्यांनी BMW TEX 5 ही गाडी विकत घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी या नव्या गाडीचा नंबर देखील नेहमीप्रमाणे जेम्स बॉन्ड (James Bond) नंबरशी निगडीत 007 घेतला आहे.
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना गाड्यांचे प्रचंड वेड आहे.
त्यांच्याकडे प्रत्येक गाड्यांचा एक इतिहास झाला असे म्हणायला काही हरकत नाही.
उदयनराजे यांनी त्यांच्या जीवनात कमी वयात पहिल्यांदा वाहन खरेदी केले ते जिप्सी (Gypsy), त्यानंतर महिंद्रा कंपनीची त्यावेळची थार (Mahindra Thar) गाडी खरेदी केली.
याच्यानंतर टाटा सियार, टाटा इस्टेट (Tata Estate), स्कार्पिओ (Scorpio), मर्सडिज (Mercedes), ऑडी (Audi), सफारी, पजेरो (Pajero) अशा अनेक गाड्या त्यांच्या ताफ्यात एकामागून एक जमा झाल्या. सध्या त्यांच्याकडे फोर्ड इंडीवर (Ford Indy) MH 11 AB 007 ही गाडी होती. त्यानंतर त्यांनी आता बीएमडब्ल्यू कंपनीची TEX 5 ही आज पुण्यातून खरेदी केली.
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) महाविद्यालयात असताना त्यांचा जास्त ओढा राजकारणापेक्षा वाहनांकडे आणि रेसिंगमध्ये अधिक होता. त्यांचे शिक्षण परदेशात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधून (automobile engineering) झाले. तसेच लंडनमधून त्यांनी एमबीए (MBA) देखील केले आहे. या कालावधीत त्यांना छंद जडला तो रेसिंगचा (Racing). लंडन (London), फ्रान्स (France), जर्मनी (Germany) या देशात ते कायमच रेसिंगच्या ट्रॅकवर दिसले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
web title: Udayanraje bhosale mp udayanraje bhosales family new car bmw 007.
Pizza मिळाला नाही म्हणून 18 वर्षाच्या मुलीनं दिला जीव, वाढदिवसाच्या 2 दिवसानंतर निघाली अंत्ययात्रा