राजापूर : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना जाळून टाकू असे वक्तव्य एका रिफायनरी विरोधी आंदोलकाने केले आहे. आंदोलकाच्या वक्तव्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उदय सामंत (Uday Samant) यांचे समर्थक तीव्र नाराज झाले आहेत. दरम्यान मुंबईतील दादरमध्ये (Dadar) शिवसैनिक (Shiv Sainik) आणि शिंदे गटामध्ये (Shinde Group) राडा झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोकणामध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आंदोलकाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांच्यासमोर सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नाना पटोले हे राजापूर (Rajapur) दौऱ्यावर असताना रिफायनरी (Refinery) विरोधक अप्पा जोशी (Appa Joshi) नावाच्या कार्यकर्त्याने स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत उदय सामंत (Uday Samant) यांना जाळून ठार मारण्याची धमकी (To Burn to Death Threat) दिली. या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात कोकण परिक्षेत्र (Konkan Zone) विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते (Special Inspector General of Police Sanjay Mohite) यांनी देखील लक्ष घातले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रोहित कुमार गर्ग (SP Dr. Mohit Kumar Garg) यांनी उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता यासंदर्भात अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय दिली धमकी ?
आम्ही आतंकवादी (Terrorist) नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो.
कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोणीही कंपन्या उघडून टाकतो.
कुठला तरी मंत्री सांगतोय, त्या उदय सामंताला जाळून टाकू आम्ही.
काय माहिती देताय ते, 2900 एकरची मालकी आहे, मालकी बिलकी गेली खड्ड्यात.
आमच्या जागा, आमचे गाव आहे. उद्या आम्ही काही खपवून घेणार नाही.
आमची जागा आम्हाला पाहिजे, पंचक्रोशी आम्हाला पाहिजे, जर कुणी आमच्या पंचक्रोशीत पाय ठेवला तर त्याचा पाय तोडून हातात देऊ.
या आंदोलनावर जर गोळीबार झाला तर याची पहिली गोळी, हा अप्पा जोशी घेईल, असं हा कार्यकर्ता म्हणाला.
Web Title :- Uday Samant | i will burn uday samant to death the activist threatened in-front of congress leader nana patole
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | सुरक्षा रक्षकाची हॉटेल व्यावसायिकाला मारहाण, ग्राहकांच्या वाहनाची केली तोडफोड
Rape In Pune | धक्कादायक ! बापच ठरला नराधम; आपल्याच मुलीचे केले लैंगिक शोषण
Rape In Pune | 19 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्या सावत्र मामाला अटक