लखनौ : वृत्तसंस्था – एकीकडे बिहारमध्ये दारूबंदी करून दारू पिणाऱ्यांसाठी वाईट बातमी असताना उत्तर प्रदेशात मात्र त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. लोकंशॉपिंग मॉल मध्ये खरेदी करण्यासोबतच आता दारुही खरेदी करणे शक्य असून योगी सरकार या प्रस्तावावर विचार करत आहेत.
आता सुपरमार्केट आणि शॉपिंग मॉलमध्ये दारूची विक्री केली जाणार असून त्यात प्रामुख्याने महाग आणि इंग्लिश दारू असणार आहे, असे सांगितले जात आहे. पूर्ण प्रस्ताव या दिशेने तयार झाला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे महसूल वाढवण्यात मदत होईल, अशी माहिती मिळत आहे. वृत्तानुसार निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी विभागीय चाचणी केली जाणार असून त्यानंतरच अंमलबजावणी केली जाईल.
तसेच मध्य प्रदेश सरकारने आपला खजिना भरून काढण्यासाठी एक पर्याय शोधत सरकारचा महसूल वाढवण्यासाठी राज्यात २४ तास दारू विक्री करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या विश्वासानुसार शहरातील निवडक हॉटेलमध्ये २४ तास दारू विक्री करण्यासाठी विचार केला जात आहे.