नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरु आहे. गुरुवारी अवंतीपोरा परिसरात एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होत. तर बाकीचे दोन दहशतवादी पंपोर भागातील मशिदीमध्ये लपून बसले होते. दरम्यान, आज (शुक्रवारी) पहाटे झालेल्या चकमकीमध्ये त्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तर गुरुवारी शोपियांमधील मुनांद येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होत. मुनांद परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे
अवंतीपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती काल सैन्याला मिळाली होती. त्याचं पार्श्वभूमीवरती लष्कराच्या ५० आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरु केली. दहशतवाद्यांना याची जाणीव होताच त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. सुरुवातीला दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण तरीसुद्धा दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु राहिला असल्याने, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. तर इतर दोघेजण मशिदीत घुसले होते.
Two terrorists hiding in the mosque also neutralised by the operation party. With this, all three terrorists trapped at Meej, Pampore are neutralised. Further search of the area is on: DGP Dilbag Singh, J&K Police (file pic) pic.twitter.com/SrogZ0Yld1
— ANI (@ANI) June 19, 2020
दरम्यान, आज सकाळी देखील जवानांकडून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, दहशतवादी ऐकत नसल्याचं पाहून, स्पेशल ऑपरेशन ग्रुप कमांडो मशिदीमध्ये घुसले आणि दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तर दुसरीकडे शोपियामधील मुनांद येथे शोधमोहीम सुरु असून, काल या ठिकाणी झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होत. सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये आणखी दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. म्हणून संपूर्ण परिसराला जवानांनी घेराव घातला आहे.