Two Cops Suspended | रेस्टॉरंट मालकाचा महिलेशी वाद, वरिष्ठांना न विचारताच तपास सुरु, दोन पोलीस कर्मचारी निलंबित

January 3, 2025

नागपूर: Two Cops Suspended | महिलेशी वाद घातल्याच्या गुन्ह्याखाली रेस्टॉरंट मालकाला पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर पोलिसांनी मारहाण करत ५ लाख रूपये मागितल्याच्या आरोपावरून नागपुरातील दोन पोलीस हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे. समाधान कांबळे आणि प्रवीण वाकोडे असे निलंबित केलेल्या पोलिसांचे नाव असून दाखल गुन्ह्यात वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता तपास केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Nagpur Police)

मिळालेल्या माहितीनुसार, यश दुबे नावाच्या व्यक्तीच्या कॅफेमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री दुसऱ्या रेस्टॉरंटचे संचालक सायरस चेंग हे गेले होते. त्याठिकाणी सायरस चेंग यांचा एका महिलेसोबत वाद झाला होता. वादानंतर महिलेने चेंग यांच्या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार प्रवीण वाकोडे यांनी वरिष्ठांशी परवानगी घेतली नाही. परस्पर प्रकरणातील केस डायरी घेत विना परवानगी तपासाला सुरूवात केली. एवढेच नाही तर, सायरस चेंग यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण करीत प्रकरण सोडवण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपये मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.