कोलकाता : वृत्तसंस्था – गर्भश्रीमंत घरातील दोन युवक अनेक महिलांसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी महिलांना देत असत. यासाठी ते महिलांकडून पैसे उकळत होते. धक्कादायक म्हणजे हे दोन्ही युवक कोलकातामधील प्रसिद्ध औद्योगिक कुटुंबाचे सदस्य आहेत. पोलिसांनी या दोघांना बुधवारी अटक केली असून तपासात खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या युवकांकडे तब्बल 182 महिलांसोबतच्या सेक्स क्लिप सापडल्या आहेत.
या प्रकरणात एका आचार्यालाही पोलिसांनी अटक केली असून तो सुद्धा एका औद्योगिक कुटुंबात काम करत होता. तिघांना काल न्यायालयात हजर केले असताना त्यांना गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एका महिलेकडे 10 लाख रुपये खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, या दोन तरूणांपैकी एकाच्या कुटुंबाने मुलाला गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. तर दुसर्या तरूणाच्या कुटुंबाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रेमाचे नाटक करून फसवायचे
हे दोन्ही तरूण महिलांशी प्रेमाचे नाटक करायचे आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे. नंतर महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत सेक्स करायचे. यावेळी ते छुप्या कॅमेऱ्यातून शुटींगही करायचे. नंतर त्यांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त मुरलीधर शर्मा यांनी या तरूणांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तपासात पोलीसांना एक लॅपटॉप साडला असून त्यामधील एका फाईलमध्ये 182 फोल्डर होते. यामध्ये विविध महिलांसोबत सेक्स करतानाचे 2013 पासूनचे व्हिडिओ आहेत. मागच्या वर्षीपासून या सर्वप्रकरणात एक आचारी त्यांना मदत करत होता. तो या महिलांकडे पैशांची मागणी करायचा आणि पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे.
रूममध्ये लावायचे कॅमेरे
महिलांशी हे दोघेजण आधी ओळख वाढवायचे. नंतर त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करून विश्वास संपादन करायचे. नंतर विविध ठिकाणी या महिलांना बोलावून त्यांच्याशी प्रणय करायचे. तत्पूर्वी रूममध्ये ते कॅमेरे लावून ठेवत असत. गेल्यावर्षीपासून त्यांनी या व्हिडिओचा वापर महिलांकडून पैसे उकळण्यासाठी करण्यास सुरूवात केली होती. एका मुलीचा असाच व्हिडिओ तयार केल्यानंतर त्यांनी तिच्याकडे प्रथम 5 लाख रूपयांची मागणी केली. तिने ही रक्कम दिल्यानंतर तिच्याकडे पुन्हा 10 लाख रूपयांची मागणी केली. शेवटी तिने सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर या त्रिकुटाचे बिंग फुटले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली.
Visit : bahujannama.com