• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अडीच वर्षात भाजपचे 22 जण नाराज, त्यापैकी 9 जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in राजकीय, सांगली
0
devendra chandrakant

सांगली : बहुजननामा ऑनलाइन – पहिल्यांदाच महापालिकेच्या सत्तेत आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या 43 नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे म्हणजे 22 नगरसेवक नाराज आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर 9 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. महापालिकेच्या बदनामीचे शिंतोडे अंगावर नको, अशी बोटचेपी भूमिका घेतल्यानंच भाजपवर आजची वेळ आली आहे.

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनंही 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूनं कौल दिला. परंतु अडीच वर्षात पारदर्शी कारभाराच्या नावावर कशी बशी सत्ता टिकली. सुरुवातीला थोड्याफार करबुऱ्या होत्या. परंतु महापौरपद खुले होताच या कुरबुऱ्यांना असंतोषाचं स्वरूप प्राप्त झालं. परंतु भाजपचे दोन्ही आमदार, महापालिका कारभाऱ्यांनी या असंतोषाकडं कानाडोळा केला. आगामी महापौर आणि उमहापौर निवडी निर्विघ्न पार पडतील असं भाजप नेत्यांना वाटलं. परंतु इथेच फसगत झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आक्रमक झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे माहिर आहेत. त्यांनी भाजपमधील असंतोष हेरला. 6 महिन्यांपासून राष्ट्रवादीनं भाजपला सुरूंग लावण्याचं नियोजन सुरू केलं. या नगरसेवकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढवला. त्यांच्या राजकीय भवितव्याची हमीही घेतली. त्यातून सध्याचा महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ रंगला आहे.

12 नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीनं अर्थपूर्ण बोलणी केली. अडीच वर्षांच्या सत्तेत लक्ष्मीदर्शनापासून लांब असलेल्या या नगरसेवकांनीही भाजपला चकवा दिला आहे. त्यातील 3 जणांना शहराबाहेर हलवण्याचा डाव फसला. परंतु त्यातील 9 जण हे अज्ञातस्थळी रवाना झाले. आता त्यातील 2 जण परतले आहेत. त्यांना काही घरगुती अडचणींमुळं परत यावं लागलं आहे. ते परत जरी आले असले तरी ते मनानं भाजप सोबत कितपत राहतील हा प्रश्न कायम असेल.

भाजपमधील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी स्वत:ला महापालिकेच्या कारभारापासून कायमच दूर ठेवलं आहे. याच नेत्यांमुळं जनतेनं महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपवल्याचा विसर पडला आहे. स्वत:ची बदनामी नको, भ्रष्ट कारभाराचे शिंतोडे अंगावर नोक या भूमिकेतून भाजपचे नेते महापालिकेचा गाडा हाकत आहेत.

सत्तेचा सोपान मदनभाऊंनाच लाभदायक
महापालिकेच्या स्थापनेपासून तीन वेळा मदन पाटील यांची सत्ता होती. एकदा महाविकास आणि एकदा भाजपची सत्ता आहे. मदनभाऊंच्या काळातही पदासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ होत असे. अर्ज भरेपर्यंत त्यांच्या नगरसेवकांमध्येही नाराजी, रुसवेफुगवे, होत. परंतु शेवटी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षांचा कालखंड पूर्ण होत असे. महाआघाडीच्या काळात अडीच वर्षानंतर सत्तेला सुरूंग लावला होता. आताही भाजपची वाटचाल त्याच मार्गावर आहे. त्यातून सत्ता टिकवण्यात भाजपला कितीपत यश मिळतं हे मंगळवारी स्पष्ट होणारच आहे.

Tags: BJPcorporatorGuardian Minister Jayant Patilmunicipal corporationNationalist - Congresssangliनगरसेवकपालकमंत्री जयंत पाटीलभाजपमहापालिकेनंमहापौरराष्ट्रवादी काँग्रेससांगली
Previous Post

बोर्डाचा निर्णय ! 10 वी अन् 12 वीची परीक्षा ऑफलाईनच, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल परीक्षा

Next Post

Pune Coronavirus News : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 328 नवे पॉझिटिव्ह, 6 जणांचा मृत्यू

Next Post

Pune Coronavirus News : पुण्यात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 328 नवे पॉझिटिव्ह, 6 जणांचा मृत्यू

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra chandrakant
राजकीय

अडीच वर्षात भाजपचे 22 जण नाराज, त्यापैकी 9 जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

February 22, 2021
0

...

Read more

राम मंदिराच्या बांधकामासाठी मिळालेले 22 कोटी रुपयांचे चेक झाले बाऊन्स, ट्रस्टनं सांगितले ‘हे’ कारण

4 days ago

राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात सर्वाधिक

8 hours ago

बेळगाव पोटनिवडणुकीत बाजी कोण मारणार? युवा शुभम शेळके, मंगला अंगडी यांच्यात चुरस, आज फैसला

3 days ago

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याचा ‘त्या’ व्यक्तीचा 24 तासांत उतरला ‘माज’ अन् मागितली जाहीर माफी; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

4 days ago

इंदापूर जेतवन बुद्धविहार येथे महामानवास अभिवादन; हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांची हजेरी

6 days ago

दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती !

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat