बहुजननामा ऑनलाईन टीम : फेमस टीव्ही अॅक्टर कुशल पंजाबीनं आत्महत्या केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार कुशलनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी रात्री कुशलच्या घरी त्याचा लटकणारा मृतदेह आढळून आला. कुशलच्या आत्महत्येच्या घटनेला त्याचा मित्र करणवीर बोहरा आणि चेतल हंसराज यांनीही दुजोरा दिला आहे. कुशलच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनं कलाविश्वात खळबळ उडाली आहे.
Ur demise has shocked the hell out of me.I'm still in denial @PunjabiKushal I know you are in a happier place,but this is unfathomable.
You really inspired me with the way you saw life, but what was I to know.
I will always remember u as a #dancingdaddy #fit & a #lifeenthusiast pic.twitter.com/qv31QMH8C8— Kaaranvir Bohra (@KVBohra) December 26, 2019
कुशलच्या निधनाची बातमी करणवीर बोहरानं सोशलवरून दिली आहे. कुशलचा फोटो शेअर करतो तो म्हणाला, “तुझ्या निधनाच्या बातमीनं मला मोठा धक्का बसला आहे. मला माहिती आहे की तू जिथे कुठे असशील खुश असशील. परंतु मला यावर विश्वास बसत नाहीये. ज्या प्रकारे तू आयुष्य जगत होता त्यानं मी खूप प्रेरीत झालो आहे. मला नेहमीच डान्सिंग डॅडी सारखी तुझी आठवण येईल.”
कुशलनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. इश्क में मरजांवा, देखो मगर प्यार से, कभी हां कभी ना अशा काही त्याच्या मालिका सांगता येतील. याशिवाय हृतिक रोशन, शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या बॉलिवूड स्टार्स सोबत त्यानं काम केलं आहे. सलमानच्या सलाम-ए-इश्क, आणि हृतिक सोबत लक्ष्य या सिनेमात कुशल दिसला आहे. त्यानं शाहरुख खानच्या काल या सिनेमातही काम केलं आहे.
Visit : bahujannama.com