नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुर्कीमध्ये भूकंपाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. शनिवारी अचानक आलेल्या भूकंपामुळे तुर्कीमध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. 200 हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.7 इतकी होती. यामुळे जवळ जवळ दहा इमारती कोसळल्या. पूर्वेकडील प्रांतामध्ये या भूकंपापामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंधरा वेळा सतत झटके बसल्याने येथील अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले होते. भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की शेजारील देश असलेल्या इराक, सीरिया,लेबनान येथे देखील धक्के जाणवले.
#UPDATE Death toll due to earthquake in Eastern Turkey rises to 14, as per disaster agency: AFP news agency https://t.co/S8yBTf3uOd
— ANI (@ANI) January 24, 2020
राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी ट्विटरद्वारे म्हंटले की,भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व गरजेची पाऊले उचलली जात आहेत.भीतीमुळे आपल्या घरातून बाहेर पडलेले लोक थंडीमुळे रस्त्यावरच जाळ करून थांबत आहेत.
तुर्की सरकारच्या आपत्ती आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने (एएफएडी) म्हटले आहे की सकाळी 8.55 च्या सुमारास (1755 मिलियन टन) हा भूकंप झाला. येथे भूकंप होण्याची शक्यता नेहमीच असते. तुर्की वृत्तवाहिन्यांनी घाबरलेल्या लोकांचा घराबाहेर पडतानाचा व्हिडीओ दाखवला आहे तर आरोग्य मंत्रालयाने यामध्ये कमीत कमी अठरा लोक मारले गेल्याचे सांगितले आहे. मंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, माल्टा मध्ये ढिगाऱ्यांखाली कोणीही अडकलेले नाही.
Visit : bahujannama.com