Tukaram Supe Suspended | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर ठाकरे सरकारकडून मोठी कारवाई

Tukaram Supe Suspended | Commissioner of Maharashtra State Council of Examination Tukaram Supe Suspended: Thackeray government

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam) गैरकारभार केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe Suspended) यांच्यावर ठाकरे सरकारने (Thackeray government) मोठी कारवाई केली आहे. टीईटी परीक्षेत गैरकारभार केल्याप्रकरणी तुकाराम सुपे (Tukaram Supe Suspended) यांना शिक्षण विभागाने (Education Department) निलंबित (Suspended) केले आहे. यासाठी आज त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. तुकाराम सुपे यांचे हे निलंबन त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाने तुकाराम सुपे (Tukaram Supe Suspended) यांच्या निलंबनाचा काढलेला हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (Commissioner of Maharashtra State Council of Examination Tukaram Supe) यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी (Private job) स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

सन 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा (Criminal offense) दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि. 16.12.2021 रोजी अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये (police custody) आहेत.

Web Title :-  Tukaram Supe Suspended | Commissioner of Maharashtra State Council of Examination Tukaram Supe Suspended: Thackeray government

 

 

ST Workers Strike Called Off | अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, 54 दिवसांनी निघाला ‘तोडगा’; जाणून घ्या

 

Subhash Desai | मंत्री सुभाष देसाईंचा मोठा दावा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पळवापळवी झाली’

 

Rupali Thombre Patil | ‘शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही’ – रुपाली ठोंबरे पाटील