मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सन २००४ ते २००९ च्या दरम्यान अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले तुकाराम गडाख (Tukaram Gadakh Passes Away) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही काम केले. तुकाराम गडाख (Tukaram Gadakh Passes Away) यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, बंधू किसन गडाख, पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुरुवारी मध्यरात्री तुकाराम गडाख यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, त्यांची प्राणज्योत मावळली. नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५३ साली झाला होता.
१९८९ ते १९९४ मध्ये त्यांनी शेवगाव-नेवासा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष नेते म्हणून प्रतिनिधित्व केले,
तर २००४ ते २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते
.
Web Title :- Tukaram Gadakh Passes Away | former mp tukaram gadakh passes away
हे देखील वाचा :