पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | रिक्षाचालक हे प्रवासी घेऊन जात असताना मोटार सायकलवरुन आलेल्या १२ जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तसेच त्यांच्या मुलालाही मारहाण (Beating) केली. (Pune Crime News)
याप्रकरणी दत्ता विजय शिंदे Dutta Vijay Shinde (वय २३, रा. सच्चाई मातानगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी १२ जणांच्या टोळक्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सच्चाई माता पायथा येथील कदम यांच्या पानटपरीसमोर मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षा घेऊन कदम यांच्या पान टपरीसमोर थांबले होते. त्यावेळी चार दुचाकीवरुन मुले आली. फिर्यादी यांच्याकडे पाहून ‘हाच तो हाच आहे तो’ असे म्हणू लागली. तेव्हा फिर्यादी पळून जाऊ लागले. त्यांच्या मागे पळून त्यांनी फिर्यादी यांना पकडले. लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांचा मुलगा प्रथमेश घाडगे (रा. संतोषनगर, कात्रज) यालाही मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक थोरात अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Trying to kill the young man by stabbing him saying that he is the one; The gang beat up the rickshaw puller
हे देखील वाचा :
Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना
Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…
Pune Ola- Uber | ओला-उबेरला तात्पुरता परवाना बंद, आता लागणार पक्का परवाना
DGP Rajnish Seth | ‘पोलीस पाटलांचा सारथी’ पुस्तकाचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते प्रकाशन