बहुजननामा ऑनलाइन टीम – Trupti Khamkar | अभिनेत्री तृप्ती खामकर (Trupti Khamkar) मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती झोंबिवली या मराठी चित्रपटातुन पदार्पण करणार आहे. तृप्ती खामकर (Trupti Khamkar) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गिरगीट’मध्ये माहीच्या भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. झोंबिवली या चित्रपटात तृप्ती खामकरने मालती हि व्यक्तिरेखा साकारली आहे.
अभिनेत्री तृप्ती खामकर (Trupti Khamkar) आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली कि, “मी जास्त काही उघड करू शकत नाही पण हे एक अतिशय गोड पात्र आहे. जे तुम्ही मला अनेकदा साकारताना पाहिले असेल. पण मी ही भूमिका निवडली कारण ती व्यक्तिरेखा स्वतःच खूप शक्तिशाली आहे. ती महिला सक्षमीकरणाची हाक देते, ती स्वतःसाठीच आहे. ज्याचा विचार आपल्या समाजातील महिलांसाठी खूप गरजेचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अभिनेत्री तृप्ती खामकरने (Trupti Khamkar) चित्रपटाच्या टेक स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ”झोंबिवली या चित्रपटातुन प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात तृप्ती खामकर, अमेय वाघ (Ameya Wagh), वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता झोंबिवली हा हॉरर-कॉमेडी चित्रपट (Horror-comedy movies) प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Web Title :- Trupti Khamkar | trupti khamkars debut marathi film industry will be seen zombivali marathi movie.
Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप
Pune Crime | लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून दुसर्या महिलेबरोबर अनैतिक ‘संबंध’
Pune Crime | शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या