हिमांशू नावाचा तरुण गाडी आणि मृतदेहाला आग लावायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला जागेवरच पकडले. अजय आणि त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना धारदार शस्त्राने कापून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शामली मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अजय यांच्यासह त्यांची मुलगी वसुंधरा पाठक (वय १२) आणि त्यांची पत्नी स्नेहा पाठक (वय ३६) यांच्यासह अजून तीन जणांना ठार मारण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील डीएम आणि एसपी घटनास्थळी गेले. फॉरेन्सिक टीमनेही त्यांचे काम लगेच सुरू केले.
काल रात्रीपासून अजय पाठक यांचे घर बंद असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अजय यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह घरात पडला असल्याची माहिती पोलिसांना ३१ डिसेंबर रोजी मिळाली.एकीकडे कुटुंबातील सदस्यांचा खून झालेला असताना अजय यांचा मुलगा भागवतही घरातून बेपत्ता आहे. या घटनेचा खुलासा अजून तरी समोर आलेला नाही. तसेच माध्यमांनाही घरात जाण्यापासून थांबवले होते. पोलिसांची पथके तयार असून त्यांनी आरोपींचा शोध घेण्याचे कामकाज सुरु झाले असून आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असे डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. तसेच आरोपी कोण असून खून का झाला, या निकालापर्यंत पोलीस अजून पोहोचलेले नाहीत.
Visit : bahujannama.com