गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माओवाद्यांनी बॅनरच्या माध्यमातून आदिवासीना आवाहन केली कि नागरिकांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावे.माओवाद्यांना न जुमानता धानोरा तालुक्यातील काकडवेली गावाजवळ आदिवासींनी या बॅनरची होळी करीत माओवाद्यांविरुद्ध एल्गार पुकारला.
येथील माओवाद्यांचा लोकशाहीला विरोध आहे. त्यामुळे ते प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन विविध प्रसार माध्यमाच्या द्वारे करतात. त्यामध्ये बॅनर तसेच परिपत्रके किंवा गावात संध्याकाळी जाऊन ते सांगणायचे काम करतात. याचाच एक भाग म्हणून धानोरा तालुक्यातील काकडवेली गावाजवळ माओवाद्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना लाल कापडी बॅनर बांधले आहे.
या बॅनर च्या माध्यमातून नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. कोणीही मतदान करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकेही मोठ्या प्रमाणात वाटण्यात आली. काकडवेलीच्या गावकऱ्यांनी माओवाद्यांच्या धमकीला न जुमानता बॅनरची होळी करत माओवाद्यांच्या या आवाहनाचा विरोध केला. लोकशाही जिंदाबाद च्या घोषणा देत मतदानाचा निर्धार केला. जिल्हा प्रशासनाकडून मतदान वाढावे यासाठी जनजागृती केली जात आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली आहे.